‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रा

मुंबईत मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्र्यांसमवेत ना. पंकजा मुंडेंचा सहभाग


मुंबई।दिनांक १४। 

भारतीय सेनेने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे दाखविलेल्या शौर्य, संयम आणि बलिदानाच्या सन्मानार्थ भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली. या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी देशसेवा केलेल्या सैन्यदलातील सेवानिवृत्त अधिकारी आणि जवानांची लक्षणीय उपस्थिती होती.


ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटीपर्यंत काढलेल्या या तिरंगा यात्रेला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ऑगस्ट क्रांती मैदानातील स्तंभाला अभिवादन करुन  तिरंगा यात्रेला सुरुवात झाली आणि गिरगाव चौपाटी येथील हुतात्मा तुकाराम ओंबाळे यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र अर्पण करत अभिवादन करुन या यात्रेचा समारोप झाला.  


  या तिरंगा यात्रेत भाजपाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री आशिषजी शेलार, मंगलप्रभात लोढा तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !