इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

 कै.शिवाजीराव खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरण: भव्य दिव्य सोहळ्यात दोन दिवस कांदेवाडीत हरिनामाचा गजर !

नरदेहाचा मुख्य उद्देश परमार्थ साधना आहे - ह.भ.प. प्रशांत मोरे महाराज देहुकर


धारूर (प्रतिनिधी) :- 

         कांदेवाडी ता.धारूर येथील कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरणनिमित्त दि.३० एप्रिल रोजी ह.भ.प.सोपान महाराज कनेरकर  व दि.१ मे रोजी ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे यांचे सुश्राव्य किर्तन झाले. या सुश्राव्य कीर्तन कार्यक्रमास ग्रामस्थ व परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कै. शिवाजीराव खाडे यांच्या तृतीय पुण्यस्मरनार्थ दोन दिवस कांदेवाडीत हरिनामाचा गजर 

झाला.जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.प्रशांत मोरे महाराज देहुकर यांच्या किर्तनाने समारोप झाला.नरदेहाचा मुख्य उद्देश परमार्थ साधना आहे  असे ह.भ.प मोरे महाराज देहुकर यांनी सांगितले.

      परळी विधानसभा मतदारसंघाचे आ. धनंजय मुंडे यांचे विश्वासू प्रदीप खाडे, विलास खाडे, बालासाहेब खाडे यांचे वडील जेष्ठ नागरिक, शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तीमत्व कै.शिवाजीराव रामभाऊ (अण्णा) खाडे यांच्या पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शुक्रवार दि.१ मे रोजी सकाळी ११ ते १ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचे  वंशज ह.भ.प.मोरे महाराज यांचे सुश्राव्य हरिकिर्तन झाले.प्रदीप खाडे, विलास खाडे, बालासाहेब खाडे यांनी महाराजांचा यथोचित सत्कार केला.कै.शिवाजीराव खाडे हे आदर्श व्यक्तीमत्व होते आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून  हे धार्मिक परंपरा जोपासत आहेत. आई - वडीलांच्या सेवेसारखे पुण्य कशातच नाही या गोष्टीकडे लक्ष केंद्रीत करत ते आपले कार्य करित आहेत. आपल्या वडिलांची मनोभावे त्यांनी सेवा केली. आपल्या वडीलांच्या स्मृती कशा जपाव्यात याचे उत्तम उदाहरण हे तिघे भावंड आहेत. त्यांच्यामुळे आज अध्यात्मिक वातावरण वाढत आहे असा गौरव महाराजांनी यावेळी केला.

       "नरदेहीचा हाचि मुख्य स्वार्थ" या संत तुकाराम महाराज यांच्या अभंगावर कीर्तनसेवा करतांना महाराजांनी पुढे सांगितले की,नरदेहाचा मुख्य उद्देश परमार्थ साधना आहे म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती. हा देह केवळ भौतिक सुख-दुःखासाठी नाही, तर आत्म-साधनेसाठी आहे. नरदेहाचा अर्थ मानवी जन्म. हा जन्म केवळ सांसारिक सुख-दुःखासाठी नसून, आत्म-ज्ञानासाठी आहे. यात अनेक संधी मिळतात, जसे की, चांगल्या माणसांचा सहवास आणि ज्ञान मिळवणे. 

चांगल्या आणि ज्ञानी लोकांचा सहवास आपल्याला परमार्थ साधण्यास मदत करतो.देवाचे नामस्मरण आणि भक्ती आपल्याला आत्म-ज्ञानाकडे नेऊ शकते.देहाची लालसा सोडून, परमार्थ साधनेसाठी जीवन घालवणे हेच मुख्य ध्येय आहे.नरदेहाचा मुख्य उद्देश आत्म-साधना आहे, आणि यासाठी देहाची लालसा सोडून, परमार्थ साधनेकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे हभप मोरे महाराज देहुकर यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....