इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

निकालापुर्वी वैभवी भावुक: काय बोलली?

स्व.संतोष देशमुखांची लेक वैभवी झाली १२ वी उत्तीर्ण: मिळवली चांगली टक्केवारी !

     मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करण्यात आली. आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने महाराष्ट्रभर आंदोलन केले. नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. वैभवीचे हे बारावीचे वर्ष होते. त्यामुळे डिसेंबरपासून वडिलांना न्याय मिळावा यासाठी फिरणाऱ्या वैभवची परीक्षेत कामगिरी कशी असणार याची उत्सुकता होती. वैभवीने आपल्या गुणांनी सगळ्यांना चकीत केले. बारावीमध्ये  तब्बल तिला 85.33 टक्के गुण मिळवले आहेत.बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेत वैभवी देशमुखला 85.33 टक्के गुण मिळाले आहेत. संतोष देशमुख यांच्या मुलीला इंग्रजी विषयात 63, मराठीत 83, गणितामध्ये 94, फिजिक्समध्ये 83, केमेस्ट्रीत 91 आणि बायोलॉजी विषयात 98 गुण मिळाले आहेत. तिला एकूण 600 पैकी 512 गुण मिळाले आहेत.

निकालापुर्वी वैभवी भावुक: काय बोलली?

महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजेनंतर हा निकाल विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे. हा निकाल जाहीर होण्यापूर्वी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने आपल्या वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आहे. यावेळी वैभवी वडिलांच्या आठवणीने भावुक झालेली बघायला मिळाली.

बारावीच्या परीक्षेच्या काळातच संतोष देशमुख यांची हत्या झालेली असल्याने त्यावेळी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. त्याच परिस्थितीत वैभवीने 12वी ची परीक्षा दिली होती. आज निकाल असल्याने वैभवी वडिलांच्या आठवणीने भावुक झाली. माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारायला आज माझे वडील नाही, याचं दु:ख होतं, असं यावेळी वैभवी म्हणाली. माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने माझा निकाल चांगलाच लागेल अशी भावना देखील यावेळी तीने व्यक्त केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!