साखरपुड्यातच संपन्न झाला दोन अभियंत्याचा विवाह सोहळा
शिंदे व कांदळकर परिवाराचा आदर्श, गौरवास्पद उपक्रम
अंबाजोगाई -/वसुदेव शिंदे
साखरपुड्यातच दोन अभियंत्यांचा शुभ विवाह सोहळा पुणे जिल्हयातील क्षेत्र आळंदी येथे मोठ्या थाटामाटात नुकताच संपन्न झाला. हा आदर्श दाखविणाऱ्या शिंदे कांदळकर या दोन्ही परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या बाबतची माहिती अशी की पुणे येथील नारायणराव कांदळकर यांची अभियंता असलेली कन्या मनिषा व बिड जिल्यातील केज तालुक्यातील मौजे होळ येथील रहिवासी असलेले संदिपान (काकाजी) नानाभाऊ शिंदे यांचे अभियंता असलेले तृतीय पुत्र रामेश्वर यांचा साखरपुडा नुकताच आळंदी येथे निश्चित करण्यात आला होता. त्यातच दोन्ही कुटुंबातील सदस्य व इतर नातेवाईक साखरपुडा आणि विवाह एकाच वेळी करण्याची इच्छा व्यक्त केली आणि साखर पुड्याच्या कार्यक्रमातच विवाह सोहळा थाटामाटात संपन्न झाला.
भारतीय संस्कृतीमध्ये विवाह सोहळ्याआधी साखरपुडा करण्याची पद्धत आहे ज्यात मुलगा आणि मुलगी एकमेकांना स्वीकारतात आणि विवाहबंधनात बांधले जातात.
साखरपुडा आणि विवाहाचा सोहळा एकाच वेळी करणे हा दुग्ध शर्करा योग असून हा सोहळा दोन्ही परिवाराच्या दृष्टीने सोयीचा व आनंदाचा क्षण ठरला असे कांदळकर व शिंदे परिवाराने म्हटले आहे.दिनांक 16/05/2025 रोजी शुक्रवारी
साखरपुड्यातच विवाह संपन्न झाल्याने वधु -वर दोन्ही कडील परिवाराला आनंद झाला परिवारातील सदस्यांना एकाच वेळी साखरपुडा व विवाह सोहळा साजरा झाला हे पाहण्याचे भाग्य लाभले साखर पुड्यातच विवाह सोहळा एकत्र झाल्याने मांडवातआनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.साखरपुडा आणि विवाह एकत्र करणे हे अधुनिक पद्धतीचे एक आदर्शव्रत उदाहरण आहे.यामुळे वेळ,खर्च आणि तयारी कमी लागते हीच बाब या दोन्ही परिवारानी लक्षात घेऊन हे पाऊल उचलले.कांदळकर व शिंदे दोन्ही परिवाराचे याबद्दल अभिनंदन होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा