अल्पवयीन मुलीच्या बळजबरीने खांद्यावर हात टाकून फोटो काढले, नातेवाईकांना पाठवले: एकाविरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल
परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
दैठणाघाट या गावातीलच एका अल्पवयीन मुलीस वारंवार पाठलाग करुन त्रास दिला.बळजबरीने या अल्पवयीन मुलीच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढले तिची बदनामी करण्याच्या उद्देशाने ते फोटो नातेवाईकांना पाठवले.या प्रकरणात एकाविरुद्ध विनयभंग, बदनामी केली म्हणुन पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, यातील आरोपी युवकाने गावातीलच एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला वारंवार त्रास दिला.तीचा वारंवार पाठलाग करुन जबरदस्तीने पिडीत मुलीच्या खांद्यावर हात टाकून तिच्या सोबत फोटो काढुन तिला लज्जा वाटेल असे कृत्य केले. तिचा विनयभंग केला.या मुलीची व तीच्या आईवडीलांची बदनामी व्हावी या उद्देशाने हा फोटो त्यांच्या नातेवाईकांना पाठवुन हीच्या सोबत माझे 2 वर्षापासुन लफडं आहे.मी हीचे 8 वेळेस लग्न मोडले आहे असे खोटे सांगून बदनामी केली म्हणुन परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुरनं 225/ 2025 कलम 74,75(2)78,356 (2) भारतीय न्याय संहीता सह कलम 8,12 पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीला अटक करण्यात आली आहे.पुढील तपास सपोनि जाधवर पिंक मोबाईल पथक यांच्याकडे देण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा