प्रामाणिक पणे जगणे हीच खरी देवपूजा-डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे 

श्री क्षेत्र दत्त धाम सारडगाव  येथे अनुष्ठान समारोप

 परळी :मनापासून केलेली कोणतीही पूजा देवाला मान्य होते. परंतु प्रामाणिक पनाने जगणे हीच खरी देवपूजा होय असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रसिद्ध  विचारवंत, कीर्तनकार डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज यांनी त्यांच्या 7 दिवसाच्या अनुष्ठान समारोपा प्रसंगी केले. 

    भगवान  शंकराचार्य यांनी प्रति काशीचा दर्जा दिलेल्या दत्त धाम येथे मौन रुपी अनुष्ठान, रुद्राभिषेक पूजन, गुरू चरित्राचे पारायण,दत्त गुरूंना भिक्षा, गो माता पूजन असे दैनंदिन कार्यक्रमझाले. दत्त गुरू सर्वांना मार्गदर्शन करणारे असून त्यांच्या दर्शन पूजनाने सर्व प्रकारचे कल्याण होते. म्हणून दत्त गुरूंचे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज यांनी सुद्धा दत्त गुरूंचे वर्णन केले आहे.जीवनात गुरू असावा. त्यांचे शिवाय जीवन समृद्ध होत नाही. असे मौन सांगता प्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाला  गंगाखेडचे  रामराजे फड, प्रभाकर दहिफळे, वैभव दहिफळे, ओमकेश दहिफळे, बालाजी घुले, प्रभाकर  आंधळे, भानुदास आघाव,बाबू सातभाई,बाळू आघाव ,फुलचंद आघाव, पपन गोलेर यांच्या सह पंचक्रोशीतील भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.सूर्यकांत दहिफळे सावरगाव  यांचे तर्फे महाप्रसाद करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !