वैद्यनाथ देवस्थानच्या जागेवर अतिक्रमण ; पोलिसात तक्रार

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 

      परळी शहरातील चादापूर रोड भागातील वैद्यनाथ देवस्थानाच्या जागेवर काही जनाकडून अतिक्रमण करत असल्याची तक्रार आकाश पुजारी यांनी केली आहे. याबाबत कडक कारवाही करावी अशी मागणी होत आहे.   

       याबाबत दिलेल्या निवेदनात म्हणटले आहे की, सर्व्हे नंबर ३२२/५ लागून असलेल्या वैद्यनाथ देवस्थान जमीनिवर  कलम १४५ सीआरपीसी  लागू असतानाही काही जन अतिक्रमण करत आहेत. वैद्यनाथ देवस्थानची इनामी जमीन आहे. सदर प्रकरणात तहसीलदार यांनी कलम १४५ सीआरपीसी कलम नुसार वादग्रस्त जमीनवर दोन्ही पार्टीला पायबद घालण्यात आला आहे. पुढील आदेश येई पर्यंत कोणीही हक्क गाजवू नये असे सांगण्यात आले असताना ही शेख खालील पाशा ऍटोवाला व इतर पाच ते सहा जण यांनी जीसीबीच्या सहय्याने  वादग्रस्त जागेवर अतिक्रमण करून कलम १४५ सीआरपीसी ची उल्लंघन केले आहे. सदरील जागेवर अतिक्रमण करणाऱ्यावर कारवाई करावी यासाठी परळी शहर पोलिस  ठाण्यात आकाश पुजारी यांनी तक्रार देऊन मागणी केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार