उड्डाणपूल दुरुस्तीही अत्यंत गरजेची...!

प्रशासकीय नियोजन पुर्ण: मध्यरात्री १२ वा.पासुन ५ जुलैपर्यंत उड्डाणपूलावरून वाहतूक राहणार बंद !


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

    येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्ती चे काम  करण्यासाठी आज मध्यरात्रीपासून उड्डाणपूलावरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.याबाबत राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांनी अधिकृतपणे सांगितले असुन प्रशासकीय नियोजन पुर्ण झालेले आहे त्यामुळे ५जुलैपर्यत वाहतूक बंद ठेवून तातडीने उड्डाणपूल दुरुस्तीची कामे केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
    डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी तब्बल एक महिन्यापेक्षा अधिक दिवसांसाठी बंद करण्यात येणार असल्याची सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जारी केली होती.त्यानुसार काम सुरु होणार आहे. याबाबत उपविभागीय अभियंता, रा. म. उपविभाग लातूर यांनी संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने परळी वैजनाथ शहरातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ ब वरील डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाची तांत्रिक दुरावस्था लक्षात घेता त्या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. दुरुस्तीच्या कामास अडथळा येऊ नये व वाहतुकीतील अपघाताचा धोका टाळण्यासाठी पुलावरील सर्व प्रकारची वाहतूक दि.१/०६/ २०२५ पासून दि. ०५/०६/२०२५ पर्यंतच्या कालावधीत बंद ठेवावी लागणार आहे.असे पत्र निर्गमित केलेले आहे. त्या अनुषंगाने उद्या दि.१ जुन पासून उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामांना सुरुवात होणार आहे. अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग उपविभाग लातूर यांच्या सुत्रांनी दिली आहे.

उड्डाणपूल दुरुस्तीही अत्यंत गरजेची...

         दरम्यान परळीत येण्याचे मुख्य प्रवेशद्वार हा डाॅ.श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूल आहे.हा पुल मुख्य मार्गिका असुन यावरुनच मोठ्या संख्येने सर्व प्रकारची वाहने जातात.त्यामुळे नियोजित वेळेनुसार दुरुस्तीची कामे त्या त्या वेळी होणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.काही दिवसांसाठी वाहतूक मार्ग बदलल्याने नागरिकांना काहीसा त्रास सहन करावा लागणार असला तरी उड्डाणपूल भविष्यात निर्धोक राहणे हेही महत्त्वाचेच आहे.उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामानंतर कात टाकणार असुन सर्वांच्या हितासाठी आणि कोणताही धोका उत्पन्न होवू नये यासाठी ही कामे होणेही गरजेचे आहे.दुरुस्तीची ही कामे योग्य व युद्धपातळीवर केली जाणार आहेत. वाहतूक बंदबाबत सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

  1. प्रशासनाने काहीच नियोजन केले नाही आणि बंद सुद्धा झाला नाही ब्रिज

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार