बीड पोलीस दलाकडून नागरिकांना आवाहन...

 भारत- पाकीस्तान युध्दाच्या अफवाबाबत स्पष्टता व नागरीकांसाठी सुचना ! अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे !

पाकीस्तान पुरस्कृत दहशतवादयांनी पहलगाम येथे दिनांक 22/04/2025 रोजी केलेल्या भ्याड हल्याचा भारताने निषेध केला आहे., पाकीस्तान मधील नागरी वस्तीची सुरक्षीतता अबाधीत ठेवुन ऑपरेशन सिंदुर राबविले आहे त्यामध्ये दहशतवादी तळ उधवस्त केले आहेत त्यामुळे पाकिस्तान सिमावर्ती भागात हल्ले करत आहे. भारताकडुन त्यांचे सर्व हल्ले सक्षमपणे हाणून पाडण्यात भारतास यश येत आहे. परंतु तरीसुध्दा पाकिस्तानकडुन भारतामध्ये काही अफवां पसरवुन गोंधळाचे वातावरण निर्माण करण्यासाठी सोशल मिडीया हॅक करुन खोटया अफवा पसरविण्याची शक्यता नाकारता येत नाही.


या अनुषंगाने सर्व नागरीकांना खालील मुद्दयावर बीड पोलीस दलातर्फे अहवान करण्यात येत आहे!


01) भारत एक संघ आहे, सर्वांना भारत एकसंघ असल्याची प्रचिती दाखवण्यासाठी एकजुटीने आपले देशाप्रतीचे कर्तव्याचे पालन करावे.


02) अफवांवर विश्वास ठेवु नका, कोणतीही माहिती केवळ अधिकृत शासकिय स्त्रोतांकडुनच स्विकारा.


03) सोशल मिडियावर चुकीच्या माहितीचा प्रसार करु नका अफवा पसरवणे कायदयाने दंडनीय आहे.


04) सोशल मिडियाचा वापर करताना अनोळखी, संशयास्पद लिंकवर क्लीक करु नये.


05) सोशल मिडीयाची काळजीपुर्वक हाताळणी करावी.


06) लष्करी, निमलष्करी दलाच्या हालचालीबाबत काहीही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सोशल मिडियावर व इतरत्र माहिती प्रसारीत करु नये.


07) स्थानिक प्रशासनाच्या सुचनेचे पालन करा. शाळा, कार्यालये, वाहतुक याबाबत बदल झाल्यास प्रशासन माहिती देईल.


08) कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलीस किंवा प्रशासनाशी त्वरीत संपर्क साधावा.


09) नागरीकांना जातीय सलोखा राखण्यासाठी सर्व स्थरावर प्रयत्न करावेत, कोणतीही जातीय, धार्मिक तेढ निर्माण होईल असे कृत्य करु नये.


10) भारत एक मजबुत आणि सजग देश आहे. नागरीकांनी शांतता राखावी, संयम बाळगावा आणि देशाच्या सुरेक्षेसाठी जागरुक राहावे.


11) बीड जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष, येथे 02442-222333 या क्रमांकावर संपर्क साधावा.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !