काळरात्र! सर्पदंशाने दोन सख्या भावंडांचा मृत्यू, कोयाळ गाव हळहळलं 


धारूर (बीड) : धारूर तालुक्यातील कोयाळ गावात २४ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावाला हादरवून सोडले आहे. मुंडे कुटुंबातील दोन निष्पाप चिमुकल्यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली.

प्रदीप मधुकर मुंडे यांची सात वर्षांची मुलगी कोमल आणि पाच वर्षांचा मुलगा शिवम हे रात्री झोपेत असताना त्यांच्या अंगावर साप आला. सर्पदंश झाल्यानंतर दोघांची प्रकृती झपाट्याने खालावली. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला.या घटनेमुळे संपूर्ण कोयाळ गावावर शोककळा पसरली आहे. मुंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आहेत. सर्पदंशामुळे एका कुटुंबातील दोन निष्पाप जीवांचा गेलेला बळी सर्वत्र हळहळ निर्माण करणारा आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !