परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

नगर परिषदेला निवेदन....

प्रभू वैद्यनाथ मंदिर : 241 वर्षांपूर्वीच्या पायऱ्या; पुरातन पवित्र दगडांचे जतन करावे : अश्विन मोगरकर

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) 

    ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरात अनेक कामे चालू आहेत. त्यापैकी मंदिराच्या पूर्व घाटावर आवश्यकता नसतानाही व प्रशासकीय मान्यता नसताना मंदिराच्या पूर्व घाटावरील पायऱ्या काढून नव्या दगडात पायऱ्या टाकण्यात येत आहेत. त्या पुरातन पायऱ्यांच्या पवित्र दगडांचे जतन करावे अशी मागणी भाजपा पदाधिकारी अश्विन मोगरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

      पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इसवीसन १७८४ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करताना हा पूर्व घाट बांधलेला होता. २४१ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या घाटाच्या पायऱ्या अजूनही सुस्थितीत होत्या. या पायऱ्यांचे पौराणिक महत्व खूप मोठे आहे. पूर्व पायऱ्यांचे दर्शन घेऊन मगच वैद्यनाथाचे दर्शन घेण्याची प्रथा पाळली जाते. या पूर्व दिशेच्या पायऱ्यांवर कार्तिक महिन्यात सूर्यनारायण काढून पूजा करण्याची अनादी काळापासून परंपरा आहे.


काढलेल्या सर्व पायऱ्यांच्या दगडांचा भविष्यात मंदिरातील कामात उपयोग व्हावा व प्रभू वैद्यनाथ भक्तांच्या धार्मिक भावनांचा आदर व्हावा यासाठी या पायऱ्यांचे जतन होणे आवश्यक आहे. परळी नगर परिषदेकडे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र विकास योजनेत होत असलेल्या कामाचे नियंत्रण व लक्ष ठेवण्याची जबाबदारी निश्चित आहे.


या अनुषंगाने भाजपा पदाधिकारी अश्विन मोगरकर यांनी नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्र्यंबक कांबळे यांची मंगळवार दि. १३ मे रोजी भेट घेऊन निवेदन दिले. प्रशासनाने या प्रकरणात त्वरित व संवेदनशीलपणे दखल घ्यावी अन्यथा परळी नगरपरिषदेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल असा इशाराही अश्विन मोगरकर यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!