परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश

 परळीतील जुन्या थर्मलच्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे तसेच नवीन संच उभारणीचा प्रस्ताव सादर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आदेश

वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांना निधीची कमतरता भासणार नाही कामे दर्जेदार पद्धतीने वेळेत पूर्ण करा अजित पवारांचे निर्देश


परळी वैद्यनाथ (प्रतिनिधी) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित  पवार यांच्या परळी दौऱ्यात धनंजय मुंडे यांच्या एका महत्त्वाच्या मागणीला यश आले आहे. परळी येथील जुन्या औष्णिक विद्युत केंद्राच्या जागेत बंद असलेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत नवीन मेगा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे यासह नवीन थर्मल मध्ये प्रस्तावित संच क्रमांक ९ ची उभारणी करणे, राख प्रदूषण नियंत्रण उपाययोजना जुन्या विश्राम गृहाचे नूतनीकरण, संच क्रमांक ६ ते ८ साठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत आदी मागण्याना सकारात्मक प्रतिसाद देत अजित पवार यांनी याबाबत चे प्रस्ताव शासनास सादर करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. 


माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांनी याबाबत सातत्याने मागणी केली होती, त्यानुसार या प्रस्तावाच्या अनुषंगाने आज संबंधित अधिकारी यांनी अजित पवार यांच्या समक्ष सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर त्यांनी या सर्वच मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आज औष्णिक विद्युत केंद्रातील विविध मागण्यांसह परळी वैद्यनाथ येथील श्री वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या कामांचाही समग्र आढावा घेण्यात आला. माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांच्या सहमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रयत्नातून वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थस्थळाच्या व परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून 286.68 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता दिल्यात आलेली असून यातून विविध विकास कामे सुरू आहेत. या कामांना निधीची कमतरता कुठेही भासू देणार नाही मात्र अत्यंत दर्जेदार पद्धतीने व ठराविक वेळ येथे कामे पूर्ण केली जावीत असे अजित पवारांनी स्पष्ट केले. 


बैठकीस अजित पवारांसह मंत्री पंकजाताई मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे, आयुक्त राजेश देशमुख, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांसह संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते. दरम्यान धनंजय मुंडे यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल उपुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!