अल्पवयीन मुलींशी लग्न परळीत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल
परळी (प्रतिनिधी)
विवाहयोग्य वय झालेले नसताना बळजबरीने विवाह करुन जबरदस्तीने शारीरीक संभोग केल्याप्रकरणी परळी शहर व संभाजीनगर पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
परळी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पेठ मोहल्ला भागातील ३६ वर्षीय शेख अमिन शेख मुस्सा याने हैद्राबाद येथील एका अल्पवयीन मुलीशी विवाह करुन दि.२ जानेवारी ते १ एप्रिल दरम्यान जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले याप्रकरणी हैद्राबाद येथील फलकनुमा पोलिस ठाण्यातुन प्राप्त झाल्याने तिघांविरुद्ध तर दुसर्या घटनेत कन्हेरवाडी येथील ऋषीकेश वचिष्ठ कानडे याने दि.२६ एप्रिल २०२४ रोजी एका अल्पवयीन मुलीशी विवाह करुन संभोग केल्याने ती गर्भवती राहिली.पुणे येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता ती अल्पवयीन असल्याचे समोर आल्यानंतर वारजे माळवाडी पोलिस ठाणे पुणे शहर येथुन ऑनलाईन पध्दतीने परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास परळी पोलिस करत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा