गांजाची विक्री करणारा पकडला: ५५ हजारांचा गांजा हस्तगत
सिरसाळा,प्रतिनिधी...
अवैधरित्या अंमली पदार्थ असलेला गांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत सिरसाळा पोलीसांनी ५५ हजारांचा गांजा हस्तगत केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, आरोपी अजहर सादेक खान पठाण, वय 28 वर्ष रा. जामा मज्जीद जवळ, रोहीला गल्ली सिरसाळा ता. परळी जि.बीड याच्या राहत्या घरातून पोलीसांनी गांजा पकडला आहे. पोलीसांनी छापा मारला असता त्याच्या ताब्यात प्लॉस्टीकच्या पिशवीत अंमली पदार्थ गांजा एकुन 5.542 किलो वजनाचा किमती 55420 रु किंमतीचा बेकायदेशिर रित्या विक्री करण्याच्या उद्देशाने कबजात बाळगुन अवैध विक्री करताना मिळुन आला म्हणुन पो.स्टे.सिरसाळा येथे गुरन 146/2025 कलम 8 (B), 20(B) NDPS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गोरकनाथ बाबासाहेब दहीफळे हे करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा