इतर भेटवस्तू देण्यापेक्षा कापडी बॅगाच द्या - कार्यकर्त्यांना केले आवाहन

चला, प्लास्टिकमुक्ती करू या ; एकल प्लास्टिक वापरबंदी व प्रदूषणाबाबत ना. पंकजा मुंडेंची पुण्यात जनजागृती मोहीम

इतर भेटवस्तू देण्यापेक्षा कापडी बॅगाच द्या - कार्यकर्त्यांना केले आवाहन


'कापडी पिशवी वाटप मशीन' चेही केले उद्घाटन


पुणे । दिनांक ३०।

पर्यावरण मंत्री ना. पंकजा मुंडे यांनी राज्यात सध्या "नो प्लास्टिक" मोहीम सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून पुण्यात आज त्यांनी 'एकल प्लास्टिक वापरबंदी व प्रदूषणाबाबत जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी त्यांच्या हस्ते कापडी पिशवी वाटप मशीन'चेही उद्घाटन करण्यात आले. कोणत्याही कार्यक्रम अथवा प्रसंगात मला अन्य काही गिफ्ट देण्यापेक्षा कापडी बॅगा गिफ्ट करा, म्हणजे इतरांना त्याचा उपयोग होईल असे सांगत चला प्लास्टिकमुक्ती करुयाचे आवाहन ना. पंकजा मुंडे यांनी केले.

        पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 'एकल प्लास्टिक वापरबंदी व प्रदूषणाबाबत जनजागृती मोहीम' आज नूतन मराठी विद्यालय, पुणे येथे यशस्वीरीत्या पार पडली. या मोहिमेचा उद्देश रोजच्या जीवनात प्लास्टिकचा  वापर न करता त्याविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जबाबदारीची जाणीव करून देणे हा आहे.या कार्यक्रमापूर्वी प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात 'कापडी पिशवी वाटप मशीन'चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी कसबा पेठचे आ.हेमंत रासने यांच्यासह विविध स्वयंसेवी संस्था, अनेक पर्यावरण प्रेमी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कापडी पिशव्या गिफ्ट करा

-----------------

याप्रसंगी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की,एकल प्लास्टिकमुक्त जीवनशैली स्वीकारून आपण जागतिक स्तरावर बदल घडवून आणू शकतो. प्लास्टिकमुळे होणारे आरोग्याच्या समस्या कमी होतात.प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण कमी होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश हा नागरिकांना प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक कापडी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक स्वरूपात जनतेपर्यंत पोहोचवणे हा आहे.प्लास्टिक पिशव्या वापरण्याऐवजी, पुनर्वापर करता येतील अशा कापडी पिशव्या वापरणे याला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे.सर्वांनी हा दृढ संकल्प करुन एकल प्लास्टिकबंदीसाठी सहयोग दिला पाहिजे. यापुढे मला इतर कुठल्याही भेटवस्तू देण्यापेक्षा कपडयांच्या बॅग गिफ्ट द्या म्हणजे त्या मी इतरांना वापरायला देऊ शकेल जेणेकरून प्लास्टिक मुक्त मोहिमेला चालना मिळेल असे सांगत चला प्लास्टिकमुक्ती करु या असे आवाहन ना.पंकजा मुंडे यांनी केले.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार