स्वागताला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.....!
राष्ट्रसेविका समितीचे परळी वैजनाथ शहरातून सकाळी पथसंचलन !
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
राष्ट्रसेविका समितीचे परळी वैजनाथ शहरातून उद्या दि.२९ रोजी सकाळी पथसंचलन होणार आहे.या संचालनासाठी सर्व धर्मबांधवांनी उपस्थित राहवे असे आवाहन राष्ट्रसेविका समितीने केले आहे.
राष्ट्रसेविका समितीच्या वतीने दि.29 मे रोजी सकाळी 9 वा.पथसंचलन होणार आहे.या पथसंचलनाची सुरुवात अक्षदा मंगल कार्यालय येथून होणार असुन छत्रपती शिवाजी महाराज चौक - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक -डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक- अग्रवाल लॉज- सरदार सायकल मार्ट -भवानीनगर - माता रमाबाई आंबेडकर चौक -सुभाष चौक- रोडे चौक- राणी लक्ष्मीबाई टॉवर- जिजामाता उद्यान समोरून - संत जगमित्र नागा मंदिर येथे समारोप होईल.अनेक ठिकाणी या पथसंचलनावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.या संचालनासाठी सर्व धर्मबांधवांनी उपस्थित राहवे असे आवाहन राष्ट्रसेविका समितीने केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा