इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

 शिवराज दिवटे अमानुष मारहाण प्रकरण: पिडिताचा नोॅदवला जबाब, वीस आरोपींवर गुन्हा;सात जण ताब्यात


परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       तालुक्यातील टोकवाडी परिसरामध्ये काल शिवराज दिवटे या युवकाला अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली होती. या महाराणीचे व्हिडिओ व फोटो संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले. त्यानंतर जखमी झालेल्या शिवराज दिवटे या युवकावर अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दरम्यान पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला असुन या प्रकरणात दहा नावे व दहा अनोळखी अशा 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सात आरोपी ताब्यात घेतले आहेत अन्य आरोपीचा तपास सुरू आहे दरम्यान या प्रकरणात जातीय रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
    याबाबत शिवराज दिवटे याने दिलेल्या जबाब म्हटले आहे की,  "दि 16/05/2025 रोजी सकाळी 11.30 वा चे सुमारास जलालपुर येथे हनुमान मंदिरात पाहुण्याचा सप्ताहाचा कार्यक्रम असल्याने माझ्या सोबत जयदीप मुंडे असे आम्ही गेलो होतो, जेवण करत असतांना तेथे काही मुलांचे भांडते झाले होते. परंतु त्यांचे नावे मला माहीत नाही. त्यानंतर दुपारी 03.00 ते 03.30 वा चे सुमारास मी व माझा मित्र वैजनाथ चौरे व जयदीप मुंडे असे मोटर सायकलवर बसुन शिवाजीनगर येथे वैजनाथ चौरे यांस सोडण्यास गेलो. त्यानंतर त्यास सोडुन मी व जयदीप मुंडे असे मोटर सायकलवर बसुन लिंबोटा गावाकडे निघालो. रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ आलो असता तिथे तीन ते चार मोटर सायकल स्वार ईसम आले. त्यांनी माझी मोटर सायकल आडवून थांबवली. त्या नंतर दोन इसमांनी मला थांबवुन हा बी त्या भांडणात होता. असे सांगून मला हाताने मारहाण करून जबरीने मोटर सायकलवर बसवुन रत्नेश्वरच्या डोंगरातील झाडीमध्ये घेवुन गेले. तेथे मोटार सायकलवरुन खाली उतरून हा त्या भांडणामध्ये होता असे बोलून यास जिवेच मारुण टाका असे बोलुन तेथे असलेल्या पंधरा ते वीस इसमांनी मला लोखंड़ी राॅड, कत्ती, बेल्ट, काचेची बॉटल, लाकडी काठी, याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर मी जोरजोरात ओरडत होतो. बाजुच्या रस्त्याने जाणारे कोणीतरी ईसम तेथे आले व त्यांना म्हणाले की, असे कोणाला मारत असतात का त्या नंतर मी बेशुद्ध झालो. मला कोणीतरी सरकारी दवाखाणा परळी येथे घेवुन आले त्या नंतर माझे नातेवाईक तेथे आले. माझे औषधउपचार चालु असतांना माझा चुलाता नामे संदिप रामदास दिवटे वय 33 वर्षे त्यांनी त्यांचे मोबाईल मधील एक व्हीडीओ मला दाखवीला असता. त्या मध्ये मला मारहाण केल्याचा व्हीडीओ असल्याचे दिसुन आले. त्या मध्ये मला मारहाण करणा-याचे नाव 1) समाधान मुंडे रा. टोकवाडी 2) रोहीत मुंडे रा. डाबी 3) अदित्य गित्ते रा. नंदागौळ 4) रुषीकेश गिरी रा. टोकवाडी 5) प्रशांत कांबळे रा. परळी 6) संमित्र  शिंदे रा. शिवाजीनगर परळी 7) सौमित्र गोरे रा. परळी (जार अॅक्वा प्लॅट) 8) रोहण वागळकर रा. परळी वै. 9) सुरज मुंडे रा. टोकवाडी 10) स्वराज गित्ते रा. परळी वै. व ईतर दहा अनोळखी ईसम असे असल्याचे व त्यांनी मला जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण केल्याचे सांगीतले."
      शिवराज दिवटेच्या या जबाबावरुन वीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.पोलिसांनी तातडीने सात आरोपी ताब्यात घेतले आहेत अन्य आरोपीचा तपास सुरू आहे दरम्यान या प्रकरणात जातीय रंग देण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!