लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण केल्याने पाठ झाली काळी निळी

 गुत्तेदार आणि त्यांच्या गुंडा कडून ट्रॅक्टर चालक मजुराला बेदम मारहाण !

लोखंडी रॉड आणि काठ्यांनी मारहाण केल्याने पाठ झाली काळी निळी 


केज :- केज येथे एका वीज वितरण कंपनीचे कामे करीत असलेल्या एका गुत्तेदाराने आणि त्याच्या गुंडाने त्यांच्याकडे काम करीत असलेल्या एका ट्रॅक्टर चालक मजुराला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाणीचे ईसमाची पाठ काळी-निळी झाली आहे.


या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सावळेश्वर येथील गोविंद दौंड हा केज येथील वीज वितरण कंपनीचे गुत्तेदार यांच्याकडे खांब उभे करण्याच्या ट्रॅक्टरवर काम करीत आहे. दि.३ मे रोजी गुत्तेदाराने त्याला शिवीगाळ केल्याने तो त्याला शिव्या का देता ? असे म्हणाला आणि त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचा राग मनात ठेवून धारूर रोड केज येथे गोविंद दौंड हा आला असता सदर गुत्तेदार आणि त्याचे पाच ते सहा गावगुंड यांनी गोविंद दौंड याला एकट्याला गाठून संगनमत करून लोखंडी रॉड आणि काठ्या व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीचे फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान या बेदम मारहाण प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नसून लवकर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती गोविंद दौंड यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !