जनसेवेचे वैद्यकीय रूप – डॉ. विवेक दंडे

परळी वैजनाथ – श्रद्धेचा केंद्रबिंदू असलेली ही परळी वैद्यनाथ नगरी आरोग्यसेवेसाठीही ओळखली जाते, आणि त्या ओळखीला समर्पितपणे आकार देणारे नाव म्हणजे डॉ. विवेक दंडे. डॉक्टर हा पेशा व्यवसायापेक्षा अधिक समाजसेवेचा आहे, हे त्यांनी आपल्या कामातून वेळोवेळी सिद्ध केले आहे.

आज 17 मे रोजी डॉ. विवेक दंडे यांचा वाढदिवस असून, या विशेष दिनानिमित्ताने त्यांचे समाजकार्य, वैद्यकीय योगदान आणि सामाजिक बांधिलकी यांचा घेतलेला हा सन्मानार्थ लेख आहे.

डॉ. विवेक दंडे यांना वैद्यकीय क्षेत्रातील प्रेरणा त्यांच्या वडिलांकडूनच मिळाली. स्वर्गीय डॉ. दिगंबर दंडे (दादा) हे परळीतील ज्येष्ठ आणि आदरणीय डॉक्टर होते. त्यांनी केवळ औषधोपचार नव्हे, तर माणुसकीची सेवा केली. तोच आदर्श डॉ. विवेक दंडे यांनी आत्मसात केला. आज त्यांच्या रुग्णालयात येणारा प्रत्येक रुग्ण केवळ उपचारच नव्हे, तर मायेचा स्पर्श अनुभवतो.

दीनदयाळ नागरी सहकारी बँकेचे संचालक म्हणून ते आर्थिक क्षेत्रातही सामाजिक भान जपत कार्यरत आहेत. सामान्य माणसाच्या हिताला प्राधान्य देणारी त्यांची भूमिका आज बँकिंग क्षेत्रातही आदर्श ठरली आहे.

डॉ. विवेक दंडे यांचे कुटुंबही सेवाभावाने प्रेरित आहे. त्यांचे कनिष्ठ बंधू प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट तेजस दंडे हे मुंबई हायकोर्ट येथे यशस्वी वकील म्हणून कार्यरत असून, कायदा आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांतून समाजसेवा घडवणारे हे कुटुंब म्हणजेच मूल्यांची शाळा आहे. 

डॉ. विवेक दंडे हे डॉक्टर, समाजसेवक आणि दूरदृष्टीचे नेतृत्व असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा, आणि त्यांच्या कार्याला सलाम करताना, परळी वैजनाथ नगरीसाठी त्यांचे योगदान हे निश्चितच प्रेरणादायी आहे.


*कोरोना काळातला खरा योद्धा*

कोरोना महामारीने जेव्हा संपूर्ण जग थांबले होते, तेव्हा डॉ. दंडे यांनी आपल्या रुग्णसेवेचा एक क्षणही थांबू दिला नाही. त्यांनी अत्यल्प साधनांमध्येही अनेक रुग्णांना दिलासा दिला. त्यांची ही समर्पित सेवा परळीच्या वैद्यकीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली गेली आहे. रुग्णालयातील सेवा ही त्यांची केवळ एक बाजू आहे. त्यांनी अनेक आरोग्य शिबिरे, रक्तदान मोहीमा, जनजागृती उपक्रम राबवून समाजाच्या आरोग्याची जबाबदारीही स्वीकारली आहे. वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग जनहितासाठी कसा करायचा, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.


संतोष जुजगर 

परळी वैजनाथ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !