प्रा. डॉ. काकासाहेब पोकळे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
परळी (वै.) - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित कला व वाणिज्य महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. काकासाहेब पोकळे यांना नुकतेच राष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षक २०२५ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सदरील पुरस्कार डॉ. पोकळे यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत रियल इंडो ग्लोबल व्हिजन सोशल डेव्हलपमेंट गुरुकुल फाउंडेशन धुळे महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रदान करण्यात आला.
डॉ. काकासाहेब पोकळे यांच्या ह्या उपलब्धीबद्दल संस्थेचे सचिव डॉ. भारतभूषण क्षीरसागर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. दीपा क्षीरसागर, सहसचिव डॉ.योगेश क्षीरसागर, सदस्य डॉ. सारिका क्षीरसागर तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ. व्ही. टी. देशमाने, डॉ. सुधाकर गुट्टे, डॉ. सिद्धार्थ जाधव तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा