आपघातात एकाचा मृत्यू...

बस स्थानकात जातांना दोन्ही चाकाच्या मध्ये येऊन एकाचा मृत्यू


अंबाजोगाई (प्रतिनिधी).....

     अंबाजोगाई बस स्थानकामध्ये बस जात असताना आज गुरुवार दि २९ रोजी सकाळी अंकुश मोरे रा धानोरा बुद्रुक ,या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

           आज सकाळी लातूर हुन आलेली बस (क्र MH१४ MH१७०१) ही अंबाजोगाई बस स्थानकात जात असताना धानोरा येथील अंकुश मोरे हा ईसम बसच्या मागील बाजूस पडून दोन्ही टायरच्या मध्ये आल्याने त्याच्या पायावरून बसचे मागील चाक गेले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला अंबाजोगाई येथीलच स्वा रा ती येथे उपचारासाठी नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.ही घटना घडल्यानंतर बसचा चालक स्वतः अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितला . 

          लातूर येथे मुक्कामी असलेली श्रीगोंदा डेपोची लातूर पुणे ही बस अंबाजोगाई बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या जवळच ही घटना घडल्याचे या बसच्या चालकाने पोलीसाना  सांगितले. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घोळवे  हे करत आहेत. 

             अंबाजोगाई बस स्थानकाच्या आसपासच्या परिसरात फळवाले, ऑटोचालक हे अत्यंत बेशिस्त व बेजबाबदार पणे आपले गाडे तसेच ऑटो कोठेही थांबवत आहेत. त्यांच्या या बेशिस्त पनामुळे अनेक वेळा बस चालकांना बस स्थानकात घालतांना किंवा बाहेर काढतात नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अंबाजोगाई शहरातील वाढलेले अतिक्रमण, ऑटोचालकांचा मुजोरपणा तसेच हातगाडी वाल्याचा बंदोबस्त करण्यासाठी ची मागणी शहवासीयांच्या वतीने पोलीस प्रशासन, नगर परिषद तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी तथा  प्रशासनाकडे केल्या जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार