इमेज
 चि. यशोधन आणि कु. किरण विवाहबंधनात: मान्यवरांच्या उपस्थितीत कोल्हापुरात संपन्न झाला शाही विवाह सोहळा कोल्हापूर प्रतिनिधी: परळी औष्णिक विद्युत केंद्रातील प्रभारी उपमुख्य अभियंता हिम्मतराव अवचार आणि सौ. मनिषा अवचार यांचे सुपुत्र चि. यशोधन तसेच स्मृतीशेष रवींद्र मगदूम यांची कनिष्ठ सुपुत्री कु. किरण यांचा शुभविवाह नुकताच कोल्हापूर येथील एल. डी. लोन, चिंचवड रोड येथे अतिशय थाटामाटात आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या विवाह सोहळ्याला सामाजिक, राजकीय,औष्णिक वीज निर्मिती,औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून नवदाम्पत्याला सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद दिले. विशेषतः, परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून अवचार आणि मगदूम कुटुंबाच्या आनंदात सहभाग नोंदवला. याप्रसंगी या प्रसंगी उपमुख्य अभियंता, भास्कर इंगळे कोराडी नागपूर, नितीन रडे. मुबंई, जगदीश मोरे, नासिक तसेच अतिरिक्त कार्यकारी अभियंता गजानन आरोळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय उदार, थर्मल पॉवर स्टेशन कॉन्ट्रॅक्टर अँड सप्लायर असोसिएशनचे अध्यक्ष अंगदभा...

परळीत अवैध पिस्तूल बाळगणारे दोन आरोपी जेरबंद :दोन विक्रेत्यांवरही गुन्हा, त्यांचा शोध सुरु

बीड, प्रतिनिधी....
              जिल्हयातील अवैध व्यवसायांच्या विरुध्द करण्यात येणाऱ्या कारवायांचा एक भाग म्हणून अवैध शस्त्रे बाळगणा-यांविरुध्द पोलीस अधिक्षक  नवनीत काँवत यांनी मोहिम उघडलेली आहे. त्यानुसार सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा यांना आदेशित करुन बीड जिल्हयात कोणत्याही प्रकारे अवैध शस्त्रांचा वापर होणार नाही याची खबरदारी घेऊन जे कोणी अवैध शस्त्रे बाळगतील अशांविरुध्द कारवाई करण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे.
           त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांना गोपनिय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, परळी वैजनाथ येथील रेल्वे स्टेशन परीसरात दोन इसम येत असून त्यांच्याजवळ अवैध गावठी कट्टा आहे. या माहितीच्या आधारे दि. १६ मे रोजी सकाळी परळी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लाऊन दोन इसम नामे अमोल रामहरी कांदे, वय ३२ वर्षे, रा. माणिकनगर, परळी , पांडूरंग प्रकाश शेंडगे, वय ३० वर्षे, रा. एलआयसी कॉलनी, रिंगरोड लातूर यांना पकडले. त्या दोघांची अंगझडती घेतली असता आरोपी अमोल कांदे याचे पॅन्टच्या आतमध्ये कमरेला एक गावठी कट्टा खोवलेला मिळून आला. तसेच त्यासोबत ०३ जीवंत काडतूस देखिल मिळून आले. दोन्ही आरोपी यांच्या ताब्यातून एक गावठी कट्टा/पिस्टल (अग्नीशस्त्र) व ०३ जीवंत काडतूस असा एकूण ४३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या अवैध गावठी कट्टा/पिस्टल बाबत अटक आरोर्पीकडे विचारपूस करता त्यांनी तो सतीष मुंडे, रा. डाबी, ता. परळी व मनोहर मुंडे, रा. बेलंबा, ता. परळी यांच्याकडून विकत घेतल्याचे प्राथमिक तपासात कबुल केले.  
          चारही आरोपींविरुध्द पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी वैजनाथ येथे पोलीस अंमलदार  विष्णू बाजीराव सानप यांच्या फिर्यादीवरुन गुरनं. १०४/२०२५, कलम ३, २५ भारताचा शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.  पकडलेल्या दोन इसमांना न्यायालयात हजर केले असता  एक दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजुर केली. पिस्टल विकणारे दोन आरोपी यांचा गुन्हयाचे तपासी अधिकारी  प्रविण जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे संभाजीनगर, परळी हे शोध घेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या