दुःखद वार्ता: भावपूर्ण श्रद्धांजली....!
ॲड.गोविंद फड यांना मातृशोक ;कौशल्या विनायकराव फड यांचे निधन
परळी वै. / प्रतिनिधी...
धर्मापुरी ता.परळी वैजनाथ येथील सरपंच तथा माजी पंचायत समिती सभापती, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. गोविंद विनायकराव फड यांच्या मातोश्रींचे शुक्रवारी दि. 30 मे 2025 पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांचा अंत्यविधी धर्मापुरी येथे झाला. त्यांच्या पश्चात दोन मुलं, तीन मुली,सुना,नातवंड असा मोठा परिवार आहे.
फड कुटुंबाचा आधारवड, मायेचा सागर, आपुलकीचे छत्र हरपल्याने भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा मायाळू व प्रेमळ स्वभाव होता.जिव्हाळ्याने, आपुलकीने सर्वांच्या सुखदुःखामध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांनी गोरगरिबांना सदैव मदत केली. अनाथांची ,साधू, संतांची, वारकऱ्यांची सेवा केली. लहान मोठ्यांना आदर, सन्मान देऊन सर्वांच्या हृदयात 'काकू' या नावाने आदराचे घर निर्माण केले. त्यांच्या निधनाने फड कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्यूज परिवार सहभागी आहे.
राख सावडण्याचा विधी
राख सावडण्याचा विधी रविवार रोजी सकाळी ठीक सात वाजता स्मशानभूमी धर्मापुरी येथे होणार आहे. त्यांच्या निधनाने धर्मापुरी सह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा