ना.पंकजा मुंडे यांनी केले बनसोडे, स्वामी आणि मुंडे कुटुंबियांचं सांत्वन

परळी वैजनाथ। दिनांक २७।

परळी तालुक्यातील नागापूर येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते कै. गणपत बनसोडे यांचे नुकतेच दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले होते, आज परळी दौर्‍यात पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेतली व सांत्वन करत धीर दिला. एक मनमिळावू व धडाडीचा कार्यकर्ता काळाने हिरावून घेतला, त्यांची उणीव भासत राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.


वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक पद भूषविलेले गणपत बनसोडे हे भाजपचे निष्ठावंत व सच्चे कार्यकर्ते होते. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून देखील त्यांनी जवाबदारी निभावली होती. एक मनमिळावू, अनुभवी व सर्वांच्या मदतीला धावून येणारे अशी त्यांची ख्याती होती. आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते असा त्यांचा परिचय सर्वज्ञात होता. एक मनमिळावू व धडाडीचा कार्यकर्ता काळाने हिरावून घेतला, त्यांची उणीव भासत राहील अशी भावना पंकजाताई यांनी व्यक्त केली.


तसेच नागापूर येथील शिवदास स्वामी यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई स्वामी यांचे काही दिवसांपूर्वी वृद्धापकाळाने निधन झाले होते, त्यांच्या कुटुंबियांची देखील ना. पंकजाताई मुंडे यांनी सांत्वनपर भेट घेतली. तर नाथरा येथील जेष्ठ नागरिक स्व. वसंतराव धोंडिबा मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. स्वामी आणि मुंडे कुटुंबियांचे सांत्वन करताना ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त करत दोन्ही कुटुंबांना धीर दिला. तसेच यादरम्यान नागापूर, नाथरा येथील ग्रामस्थ नागरिकांशी भेटून ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

••••







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार