इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

पांगरीकरांसाठी आनंदाचा 'दुग्धशर्करा' योग !

डाॅ.अक्षयच्या युपीएससीतील यशानंतर डाॅ.पवन वैद्यकीय क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील परिक्षेत झळकला;पांगरीच्या भूमीपुत्राचा सुपरस्पेशालिटी नीटमध्ये डंका !

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
         परळी तालुक्यातील पांगरी या गावातील युवकांनी यशा मागून यश खेचून आणत पांगरी गावच्या वैभवात सातत्याने मानाचा तुरा खोवला आहे .काही दिवसांपूर्वीच यूपीएससीमध्ये डॉ. अक्षय मुंडे झळकला आहे. त्या यशाचा आनंदोत्सव अद्याप सुरू असतानाच पांगरी गावातील दुसऱ्या डॉ. पवन मुंडे या भूमिपुत्राने वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत घवघवीत यश मिळवून पांगरीकरांच्या आनंदात दुग्ध शर्करा योग घडवून आणला आहे. सुपर स्पेशलिटी नीट मध्ये डॉ. पवन मुंडे यांनी यश मिळवले असून त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
   पांगरी गावचे रहिवासी असणारे डॉ. पवन बंडोपंत मुंडे नीट सुपर स्पेशालिटी 2025 परिक्षा घवघवीत यश संपादन करून उत्तीर्ण झाले आहेत. या परिक्षेतभारतात 939 रँक त्यांनी मिळवला आहे.डॉ पवन मुंडे यांचे प्राथमिक शिक्षण नांदेड मध्ये झाले. नीट परीक्षा उत्तीर्ण झाल्यांतर त्यांचे एमबीबीएसचे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे झाले. एमबीबीएस चे शिक्षण घेत असताना शस्त्रक्रिया या विषयामध्ये त्यांना आवड निर्माण झाली.त्यांतर त्यानी आपले शस्त्रक्रियाचे शिक्षण (एमएस सर्जरी) हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे येते पूर्ण केले. धुळे येथे शिक्षण सुरु असतानाच त्यानी सुपर स्पेशालिटी नीट परीक्षेची तयारी केली व पहिल्याच प्रयत्नात ते ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.पुढील शिक्षण यूरोलॉजि मध्ये घेण्यास इच्छुक असून किडनी ट्रान्सप्लांट मध्ये स्पेशालिटी करून रुग्ण सेवा करण्याचा  निर्धार त्यांनी केला आहे. डॉ. प्रदीप सारूक हे त्यांचे भावजी असुन ते किडनी ट्रान्सप्लांट फिजिशियन म्हणुन छ. संभाजी नगर येथे सिग्मा हॉस्पिटल येथे प्रॅक्टिस करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच नीट परीक्षेत यश मिळाल्याचे डॉ. पवन मुंडे यांनी सांगितले.

पोलीसपुत्राचे घवघवीत यश..
     डाॅ.पवन हे पोलीसपुत्र आहेत.त्यांचे वडील बंडोपंत मुंडे यांनी अनेक वर्षे महाराष्ट्र पोलीस दलात कर्तव्य बजावलेले आहे. सेवानिवृत्त पोलीस उपनिरिक्षक बंडोपंत मुंडे व त्यांच्या पत्नीने अतिशय जबाबदारीने तीनही मुलांना घडवले.एक मुलगा व दोन मुली तिघेही डाॅक्टर झाले.डाॅ.पवन यांनी तर वैद्यकीय शिक्षणात सुपर स्पेशालिटीपर्यंत झेप घेतली आहे. आपल्या आई वडीलांचे कष्ट व स्वप्न पुर्ण करण्याची भावना डाॅ.पवन यांनी व्यकत केली आहे.

किडनी ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट होणार:संपूर्ण कुटुंबाचीच प्रेरणा मिळाली....
      सुपर स्पेशालिटी नीट परीक्षेची तयारी केली व पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होता आले.पुढील शिक्षण यूरोलॉजि मध्ये घेण्यास आपण इच्छुक आहोत. किडनी ट्रान्सप्लांट मध्ये स्पेशालिटी करून किडनी ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट म्हणून रुग्ण सेवा करण्याचा  निर्धार आहे.आई अनिता मुंडे  वडिल बंडोपंत मुंडे, दोन्ही बहिणी डॉ. पल्लवी आणि डॉ. मोहिनी मुंडे आणि दोन्ही भाऊजी डॉ प्रदिप सारुक आणि डॉ कृष्णा गित्ते हे परिवारज सदैव पाठिशी राहिले आहेत.संपूर्ण कुटुंबाचीच प्रेरणा मिळाली आहे.
                         - डाॅ.पवन मुंडे

काय असते सुपर नीट परीक्षा?...
           प्रत्येक डॉक्टरचे स्वप्न असते की ते चांगले बनावे.  पदवी जितकी जास्त असेल तितके उज्ज्वल भविष्याची शक्यता जास्त असते. बहुतेक एमडी आणि एमएस उमेदवारांना एमसीएच किंवा डीएम हा अतिरिक्त टॅग हवा असतो.सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रम देणाऱ्या विविध आघाडीच्या संस्था आहेत. आता नीट एसएस परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये आता स्पर्धा जास्त आहे. सुपर नीट (NEET-SS) परीक्षा ही वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक महत्त्वाची परीक्षा आहे. या परीक्षेच्या माध्यमातून, वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्याची संधी मिळते. वैद्यकीय क्षेत्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या सुपर स्पेशालिटी  अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेतली जाणारी एक प्रवेश परीक्षा आहे. ही परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते आणि ती पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पदवी असलेल्या उमेदवारांसाठी असते.
       

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!