गावातून घर उठवून लावण्याची धमकी देत वीटा व काठ्यांनी मारहाण; पाच जणांविरुद्ध ॲट्राॅसिटीसह मारहाणीचा गुन्हा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
       गैरकायद्याची मंडळी जमवून मोटारसायकलला कट का मारला या कारणावरुन नागापुर कॅम्प येथे एका तरुणावर हल्ला करीत जातीवाचक शिवीगाळ केली तसेच वीटा व काठ्यांनी मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध ॲट्राॅसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
      याबाबत परळी ग्रामीण पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, यातील फिर्यादी रोहीत उमाकांत बनसोडे वय 20  रा. नागापुर कॅम्प ता. परळी वै. यास त्याच गावातील आरोपी 1) धनराज बंडु सोळके, 2) राम सुंदर सोळके, 3) कृष्णा सोळंके, 4) सुनिल सोळंके, 5) उध्दव सोळंके यांनी नागनाथ मंदिर समोर मोटार सायकलला कट मारण्याच्या कारणावरुन फिर्यादी व साक्षीदार यांना जातीवाचक शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी, वीटांनी व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादी व साक्षीदारांना गावातून उठवुन लावण्याचीधमकी दिली. अशा अशयाच्या फिर्यादीवरून पाच आरोपीं विरुद्ध गुरनं 227/2025 कलम 118(1),115(7). 352. 351(2), 351(3),189(2),190,191(2)BNS सह कलम 3(1)(r),3(1)(s),3(2)(va) अजाज अप्र कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई चेतना तिडके या करीत आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार