परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
शिवराज दिवटेला मारहाण होण्यापूर्वी माझ्या मुलाला जलालपुरात अमानुष मारहाण - समाधान मुंडेच्या आईने दाखल केला गुन्हा
परळी वैजनाथ। प्रतिनिधी...
रत्नेश्वराच्या डोंगरात झालेली मारहाणीची घटना ही लहान लहान मुलांमधील आहे. मारहाणीची घटना ही वाटईटच आहे.परंतु व्हिडिओ व्हायरल झाला,अनेकांनी हे प्रकरण उचलून धरले.माझ्या मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.परंतु या मारहाणीच्या घटनेच्या आधी माझा मुलगा समाधान यास कळत्या सवरत्या मोठ्या वयाच्या लोकांनी रिंगण करुन एकट्याला जनावरासारखे मारले आहे याचाही न्याय झाला पाहिजे अशी मागणी करत समाधान मुंडे याच्या आईने परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील एक आरोपी समाधान मुंडेंची आई छाया श्रीकृष्ण मुंडे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून भागवत साबळे, सुरेश साबळे रा.जलालपुर व त्याचे ईतर सात ते आठ अनोळखी लोकांनी त्याची मोटार सायकल आडवुन त्याला खाली पाडून जिवे मारण्याचे उद्देशाने डोक्याचे केस धरुन हातातील काठीने, बेल्टने, लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे मारण्याचा प्रयत्न करुन जखमी केले अशा फिर्यादीवरून वरुन भागवत साबळे, सुरेश साबळे व इतर सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा