आर.टी.देशमुख यांच्या निधनाचे वृत्त माझ्यासाठी अत्यंत दुःखद - धनंजय मुंडे
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
माजी आ.आर.टी.देशमुख यांच्या निधनाचे वृत्त माझ्यासाठी अत्यंत दुःखद असल्याची शोक प्रतिक्रिया आ.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला शोक...
माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार, स्व. मुंडे साहेब व स्व. अण्णांचे जिवलग सहकारी, आमचे मार्गदर्शक आर. टी. जिजा देशमुख यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. माझ्या राजकीय व सामाजिक जडणघडणीत जिजा भाऊंचे एक अढळ स्थान आहे. मुंडे आणि देशमुख कुटुंबाचे पिढीजात नाते आहे. आज त्या नात्यातील आणखी एक छाया आम्हाला पोरके करून गेली. जिजा भाऊंच्या अकाली निधनाने आम्ही एक मार्गदर्शक नेतृत्वास मुकलो आहोत, त्याचबरोबर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. या दुःखद प्रसंगी मी संपूर्ण देशमुख कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा