उड्डाणपूलाचे प्रस्तावित दुरुस्ती काम आषाढी एकादशी पर्यंत स्थगित करावे!

निदान आषाढी वारीच्या दिंड्या परळीतून जाईपर्यंत तरी उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करु नये-गोपाळ आंधळे

परळी वै.(प्रतिनीधी)वारकरी संप्रदायाची सर्वात मोठी आध्यात्मिक पर्वणी म्हणून ओळख असलेली पंढरपूरच्या आषाढी वारीला सुरूवात होत आहे.परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रात विदर्भ आणी इतर भागातून शेकडो दिंड्या मुक्कामी शहरात दाखल होत असतात.त्या सर्व वारकर्यांची गैरसोय होवू नये. या साठी शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाचे प्रस्तावित काम आषाढी एकादशी पर्यंत स्थगित करावे. निदान आषाढीवारीच्या दिंड्या परळीतून जाईपर्यंततरी उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करु नये अशी मागणी न.प.चे माजी शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

       वारकरी संप्रदायाचे व सबंध महाराष्ट्राचे आराध्य दैवत.पंढरीचा पांडुरंग परमात्मा श्रीविठ्ठलाचा आषाढी वारीचा सोहळा अगदी कांही दिवसांनी सुरू होत आहे.परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र असल्यामुळे खास करून विदर्भातील शेकडो दिंड्या या परळी शहरात मुक्कामी असतात. परंतु प्रस्तावित शामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपूलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे हा पुल वाहतूकीसाठी दिर्घकाळ बंद ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.हा पुल बंद झाल्यावर वारकर्यांची मोठी गैरसोय होणार तर आहेच .परंतु अनादी काळापासून चालत आलेली परळी मुक्कामाची परंपरा बंद होईल.त्यामुळे प्रशासनाकडून हे प्रस्तावित काम आषाढी वारी संपन्न झाल्यावरच पुलाच्या दुरूस्तीचे काम करावे अशी मागणी माजी शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार