जयवंती नदी जाय मोका पाहणीचा अहवाल न दिल्यास लोक आयुक्तांकडे तक्रार व जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसण्याचा इशारा


 अंबाजोगाई-(वसुदेव शिंदे)-

      जयवंती नदीपात्रातील अतिक्रमण काढावे या मागणीसाठी पत्रकार अभिजीत लोमटे यांचे  आमरण उपोषण चालू होते नगरपरिषद च्या मुख्याधिकारी यांनी मागण्या मान्य करत लेखी आश्वासन दिल्यानंतर आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले मात्र आठ दिवस होऊनही तहसीलदार व मुख्याधिकारी यांनी संयुक्त जायमोक्या ची पाहणी केली नाही मंगळवार पर्यंत अहवाल प्राप्त न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांनी दिला आहे.  



अंबाजोगाई शहरात धन दांडग्यांनी अतिक्रमण केल्याने नदीचा प्रवाह बंद झाला असून हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे नदीचा प्रवाह मोकळा करावा तसेच जावक क्रमांक 880 उपविभागीय अधिकारी यांनी सहाय्यक आयुक्त यांच्या पत्राचा संदर्भ देत तहसीलदार व मुख्याधिकारी यांना जाय मोक्यावर जाऊन पाहणी करून अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते या निर्देशाचे पालन करावे या मागणीसाठी डिजिटल मीडिया परिषद अंबाजोगाई चे अध्यक्ष अभिजीत लोमटे हे 29 एप्रिल आमरण उपोषणास बसले होते या उपोषणास अंबाजोगाईतील सर्वसाधारण नागरिक तसेच सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी उपोषण स्थळी येत पाठिंबा दर्शवला उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी अंबाजोगाई नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे, कार्यालयीन अधीक्षक रमेश सोनकांबळे, स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे यांनी उपोषण कर्ते अभिजीत लोमटे यांची भेट घेत जा क्र 880 उपविभागीय अधिकारी यांच्या निर्देशानुसार जाय मोक्यावर जाऊन तहसीलदार व मुख्याधिकारी संयुक्त पाहणी करून जयवंती नदी पात्रातील अधिकृत परवानधारक व अनधिकृत बांधकामाची माहिती अहवाल आठ दिवसाच्या आत सदरील अहवाल तयार करून एक प्रत अभिजीत लोमटे देण्याचे लेखी आश्वासन दिले व भूमी अभिलेख कार्यालयास तात्काळ वीज भरून नदी पात्राची मोजणी करण्याचे तसेच मुख्य रस्त्यावरील जयवंती नदीच्या पुलाखालील दोन कनग्या बुजवून नदीचा प्रवाह रोखला आहे सदरील पुलाखालील कनग्या रिकाम्या करून नदीचा प्रवाह पूर्ववत करण्याची हमी दिल्याने माननीय मुख्य अधिकारी प्रियंका टोंगे यांच्या विनंतीवरून व लेखी आश्वासनानंतर डिजिटल मीडिया परिषद चे अध्यक्ष अभिजीत लोमटे यांनी आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले असून मुख्याधिकारी दिलेली आठ दिवसाची मुदत संपून गेली आहे मात्र अहवाल अद्यापही उपोषणकर्ते यांना दिला नाही आठ दिवसानंतर याचा पाठपुरावा केला असता तहसील व नगरपरिषद यांची संयुक्त समिती स्थापन केल्याचे पत्र उपोषणकर्ते अभिजीत लोमटे यांना देण्यात आले मात्र या समितीने पुढे काही कारवाई केल्याचे दिसत नाही जयवंती नदी पात्रात अतिक्रमण करणारे हे धन दांडगे नेते मंडळी असल्याने तसेच नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी नदीपात्रात बांधकाम करण्यासाठी बेकायदेशीर परवाने दिल्याने प्रशासनाचे अधिकारी यात अडकले आहेत त्यामुळे अहवाल देण्यास विलंब लागत असून पावसाळा येण्याची वाट ते पाहत आहेत जेणेकरून हे प्रकरण काही काळ आणखी लांबेल मात्र रिलायन्स पेट्रोल पंप समोरील जयवंती नदीचा प्रवाह मोकळा करावा तसेच मंगळवार पर्यंत संयुक्त जायमोका पाहणीचा हवाल देण्यात यावा अन्यथा सहाय्यक आयुक्त यांच्या पत्रास केराची टोपली दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांची तक्रार लोक आयुक्त यांना करत कार्यालय येथे उपोषणास बसण्याचा इशारा अभिजीत लोमटे यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !