अल्पवयीन मुलीसोबत बळजबरीने विवाह व अत्याचार; परळीत आणखी एक पोक्सोचा गुन्हा दाखल 

परळी / प्रतिनिधी..

           परळी शहरातील इंद्रानगर भागात वास्तव्यास असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस बळजबरीने विवाह करत अत्याचार केल्याची आणखी एक घटना समोर आली असून या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात 22 वर्षीय युवकाविरोधात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

              पोलीस सूत्रांकडून मिळाल्याने माहितीनुसार शहरातील इंद्रानगर भागात राहत असलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस माणिक नगर भागात वास्तव्यास असलेल्या 22 वर्षीय युवकाने दि 17 ऑक्टोबर 24 रोजी आर्या हॉटेल समोरून उचलून नेत पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील तिच्या सोबत नागसेन नगर येथे लग्न केले. दि. 25/10/2024 रोजी ते दि.04/05/2025 या काळात तिच्याशी अनेकदा शारिरीक संबंध करून गर्भवती केले व शिवीगाळ करून मारहाण केली.त्रास असाह्य झाल्याने पीडित अल्पवयीन मुलीने शुक्रवार दि 23  रोजी परळी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुरन 115/2025 कलम 64 (2) (I), 64(2) (M), 115(2),351(1)(2),352 BNS सह कलम 4,6,8 पोक्सो कायदा व  सहकलम 9 बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 कायद्यान्वये या युवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पिंक पथकाच्या सपोनि जाधवर हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार