परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 खळबळजनक: सायंकाळी पांढर्‍या रंगाची इनिव्हा आली अन् उचलले: परळीतून रस्त्यावरुन एकाचे अपहरण

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
      बीड जिल्ह्यातील अपहरणांच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून गाजत असतांनाच आता परळीतील एका नागरिकाचे भरस्त्यावरुन उचलून घेऊन जात अपहरण झाल्याची घटना आज(दि.६) सायंकाळच्या सुमारास घडली.याप्रकरणी रात्री उशीरा ११.१७ वा.परळीच्या संभाजीनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
       याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दिनांक 06/05/2025 रोजी सायंकाळी 1745 वाजण्याचे सुमारास राणी लक्ष्मीबाई टाॅवर चौक ते गणेशपार रोड या मुख्य रस्त्यावरील एका हाँटेल जवळून आपहरणाची घटना घडली आहे.यातील पिडीत इसम नामें शेख अमजेद अहमद शेख वय 35 वर्ष रा. बरकत नगर परळी वै यास  अनोळखी पाच ते सहा लोकांनी पकडुन रोडवर उभ्या केलेल्या पांढर्‍या रंगाच्या ईन्व्हा गाडी मध्ये बळजबरीणे टाकुन त्याचे अपहरण करुन घेवुन गेले आहेत. अशी फिर्याद शेख जमीर शेख आमीर  रा. खुदबे नगर परळी वै. यांनी दिली आहे. यावरुन आरोपी अनोळखी ईसम पाच ते सहा जणांविरुद्ध  पो.स्टे. संभाजीनगर परळी वै. येथे गुरन - 96/2025 कलम 140 (3), बी.एन.एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोउपनि शिंदे  हे करीत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!