आढावा बैठकीत ना पंकजा. मुंडे यांनी केल्या सूचना

 भाविकांना सुलभ सोयी-सुविधा आणि वैद्यनाथ मंदिरचे पौराणिक व प्राचीन महत्व कायम ठेवून विकासकामे व्हावी !

तीर्थक्षेत्र विकास  योजना विकास कामांच्या आढावा बैठकीत ना पंकजा मुंडे यांनी केल्या सूचना

 परळी वैजनाथ। प्रतिनिधी

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर असुन त्यांच्या समवेत राज्याच्या पशुसंवर्धन तथा पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे या उपस्थित होत्या. परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या मंदिर परिसरातील तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांची पाहणी केल्यानंतर याबाबतची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत ना पंकजाताई मुंडे यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

        उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज श्रीक्षेत्र परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातंर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा शासकीय विश्रामगृह येथे आढावा घेण्यात आला. या बैठकीला पर्यावरण तथा पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे,आ. धनंजय मुंडे, जिल्हाधिकारी विवेक जाॅन्सन यांच्यासह सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

         पंकजाताई मुंडे पालकमंत्री असताना  वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडयाची मुहूर्तमेढ रोवली होती. १३३ कोटी रूपये त्यावेळी मंजूर केले होते. नंतर यात वाढ होऊन  २८६ कोटीचा आराखडा मंजूर करण्यात आलेली आहे. या अंतर्गत आता सुरू असलेल्या कामांना वेग आला आहे. ही कामे दर्जेदार व्हावीत, भक्त निवास, दर्शन मंडप, मंदिर परिसर सुशोभीकरण,यासह भाविक भक्तांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात, मंदिराचे पौराणिक व प्राचीन महत्व कायम ठेवून विकास कामे व्हावीत याकरिता खबरदारी घ्यावी अशा सूचना यावेळी पंकजाताई मुंडे यांनी या बैठकीत केल्या.


वैद्यनाथ दर्शन व विविध विकासकामांची पाहणी

------------------------

    उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व ना. पंकजाताई मुंडे यांचे सकाळीच परळी वैजनाथ येथे आगमन झाले. शक्तीकुंज वसाहत येथील हेलिपॅडवर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिरात जाऊन अजितदादा पवार, ना. पंकजाताई मुंडे, आ. धनंजय मुंडे आदींनी प्रभु वैद्यनाथाचे दर्शन घेतले. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत वैद्यनाथ मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी यावेळी त्यांनी केली. या कामांच्या संदर्भाने प्रत्यक्ष पाहणीत आढळलेल्या काही बाबींच्या बाबतीत संबंधितांना त्यांनी सूचना दिल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !