प्रतीक्षा संपली;तारीख ठरली:दहावी बोर्डाचा निकाल या तारखेला लागणार!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार, याची अपडेट समोर आली आहे. उद्या म्हणजेच १३ मे रोजी जाहीर होणार आहे.
यंदाच्या वर्षी १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. आता उद्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. १३ मे रोजी दुपारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर लॉगिन करून आपला निकाल पाहता येणार आहे. mahresult.nic.in, sscresult.mkcl.org आणि ssc.mahresults.org.in या वेबसाईटवर निकाल जाहीर होणार आहे. या वेबसाईटवर निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील निकालाची प्रत (प्रिंट) देखील घेता येईल.
दहावीचा निकाल कधी लागणार, याबाबत अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात प्रश्न होते. अखेर बोर्डाकडून निकालाची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे. दहावीचा निकाल उद्या, १३ मे रोजी निकाल लागणार आहे. बोर्डाने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, दहावीचा निकाल १५ मे च्या आत लागणार आहे. पण आता १३ मे ही परीक्षा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
दहावीचा निकाल ऑनलाइन कसा पाहायचा, याबाबत माहिती असणे आवश्यक आहे. खालील वेबसाइट्सवर तुम्ही निकाल पाहू शकता:
- mahahsscboard.in
-mahresult.nic.in
- msbshse.co.in
- mh-ssc.ac.in
- sscboardpune.in
या वेबसाइट्सवर निकाल पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा परीक्षा क्रमांक (exam roll number) आणि इतर आवश्यक माहिती भरावी लागेल. त्यामुळे निकाल पाहताना कोणतीही अडचण येऊ नये. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू झाली होती. ही परीक्षा राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा