राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या परळी शहराध्यक्ष पदी सुमित गिरी यांची नियुक्ती
नाशिक (प्रतिनिधी) : राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्यावतीने बीड जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. जिल्ह्यातील केज, माजलगांव, अंबाजोगाई, माजलगाव, कार्यकारणी पुर्ण झालेली असून बीड, आष्टी, गेवराई, नेकनूर तालुक्यांची घोषणा लवकरच होणार होईल. परळी शहराध्यक्ष पदी सुमित गिरी तरुण युवकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरील वृत्तपत्र व पत्रकार क्षेत्रात कार्य करत असतांना असंख्य प्रश्न निर्माण होत असतात. सुमित गिरी यांचे गेली दोन वर्षापासून पत्रकार म्हणून दैनिक बीडसत्ता वृत्तपत्रातून परळी तालुका प्रतिनिधी पदावर काम करत आहे. त्यांने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, पत्रकारिता राजकीय, वृत्तपत्रांच्या बातम्या देणे. परळी शहर अतिसंवेदनशील शहर व तालुका राज्यातल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांना माहिती झाली आहे.
परळी तालुका अध्यक्ष, सचिव, उपाध्यक्ष, अन्य सभासदांशी चर्चा करून निर्णय घ्यावा तसेच बीड जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यांना किंवा पदाधिकारी यांना विविध प्रकारची माहिती व संपर्क करून शहरातील निर्णय घेणे अपेक्षित होय. तालुका कार्यकारिणीच्या सदस्यांना व पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक, चर्चा, संवाद,आंदोलन, उपोषण, योग्य अयोग्य चर्चा करून पुढील निर्णय तालुका व जिल्हा कार्यकारिणी सदस्यांना कळविण्यात येवून निर्णय घेण्यात यावी असे आदेश व सुचित करण्यात येत आहे. शहरात विविध पत्रकार संघ, परिषद,शाखांचे पदाधिकारी असून त्या वरीष्ठ पत्रकार, जेष्ठ पत्रकार, वृत्तपत्रांचे संपादक, पत्रकार यांचा मानसन्मान व आदरसत्कार करणे अत्यंत गरजेचे होय.
राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांपासून ते तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांपर्यत त्यांचा मानसन्मान राखणे. अन्य कोणत्याही प्रकारची कृत्य निदर्शनास आले तर बडतर्फ करण्याचे संघाकडे अधिकार आहेत. त्यामुळे वृत्तपत्राच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्ध करण्यासाठी अहोरात्र कष्ट मेहनत आणि जिद्दीने संघाचे कार्य करावे.
बीड जिल्हा कार्यकारिणी सदस्यांचा व सर्व तालुका अध्यक्षसह कार्यकारणीची जिल्हावर बैठक होईल त्यावेळी राज्याचे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र वाटप करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी परळी शहराध्यक्ष पदी सुमित गिरी युवा पत्रकार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
राज्याचे वरीष्ठ पदाधिकारी, मराठवाड्याचे पदाधिकारी बीड जिल्हाचे पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व तालुक्यातून सुद्धा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा