अंबाजोगाईत ब्राह्मण सभेचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उत्साहात साजरा
अंबाजोगाई (वसुदेव शिंदे)-
अंबाजोगाई येथील ब्राह्मण सभेच्या वतीने सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा गुरूवार २९ मे रोजी शहराच्या देशपांडे गल्लीतील देवघर परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्यात १६ बटुंचे उपनयन संस्कार करण्यात आले सातत्याने गेल्या ४८ वर्षापासून उपनयन संस्कार सोहळ्याचा उपक्रम आर्थिक दुर्बल घटकांसाठी सातत्याने राबविला जात असल्याने या सोहळ्याचे सर्वत्र कौतुक होते.
या सोहळ्यासाठी माजी आ.पृथ्वीराज साठे,कमलाकर चौसाळकर, गिरधारीलाल भराडिया,बबन लोमटे, मनोज लखेरा,प्रसाद चिक्षे,ऍड.मकरंद पत्की, महेश लोमटे,दिनकर जोशी,अतूल देशपांडे, गणेश पिंगळे, पत्रकार प्रशांत बर्दापुरकर,राहूल देशपांडे,अविनाश मुंडेगांवकर,दिलिप सांगळे,अनिरुद्ध चौसाळकर, प्रभाकर सेलमोकर,पद्माकर सेलमोकर,सागर दिक्षित,संजय लोणीकर,मुकूंद घाटे,आनंद गोस्वामी, सुधाकर विडेकर, ऍड. कल्याणी विर्धे,अनुपमा गोस्वामी, आरती सोनेसांगवीकर आदीसह शहरातील महिला, नागरिक विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन प्रा.डॉ.गणेश पिंगळे यांनी केले कार्यक्रमासाठी ब्राम्हण सभा व पुरोहित संघ पदाधिकारी यांनी मोलाचे परीश्रम घेतले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा