गत एक महिन्यापासुन सुरु असलेल्या हनुमान व्यायाम शाळेच्या उन्हाळी शिबीराचा समारोप
परळी (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्यामध्ये हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने २२ एप्रिल पासुन सुरु असलेल्या व्यायाम शिबीर व संस्कार वर्गाचा समारोप रविवार दि.२५ मे रोजी झाला.३५ वर्षापुर्वी हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने सुरू केलेले हे शिबीर लोकचळवळ बनल्याचे समाधान असल्याचे जेष्ठ शिक्षक दत्ताप्पा ईटके गुरुजी यांनी केले.तर हनुमान व्यायाम शाळेचे हे शिबीर परळी व परिसरातील विद्यार्थ्यांचे शारीरीक,मानसिक आरोग्य सुदृढ करणारे ठरत असल्याचे वैद्यनाथ देवल कमेटीचे विश्वस्त राजेश देशमुख यांनी सांगितले.या वेळी विद्यार्थ्यांनी महिनाभर आत्मसात केलेल्या कवायती,विविध प्रकारच्या कलांचे सादरीकरण केले.
हनुमान व्यायाम शाळेच्या वतीने व वैद्यनाथ बॅंक,वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने दि.२२ एप्रिल पासुन वैद्यनाथ मंदिराच्या पुर्वेकडील शिवालय भवन मैदानावर दररोज सकाळी ५ ते ८ व सायंकाळी ५ ते ८ असे दिवसभरात सहा तास व्यायाम शिबीर व संस्कार वर्गाचे आयोजन केले होते.शिबीरातुन विद्यार्थ्यांनायोगासन,प्राणायाम,ध्यानधारणा,श्लोक पाठांतर,विविध गिते,बोधपर कथा,सुविचार,बौध्दिक खेळ,स्वंयप्रेरणेचे धडे,समयसुचकता,सूर्यनमस्कार,दंड बैठका,मल्लखांब,रोप मल्लखांब,कुस्ती,लाठी-काठी,कराटे,तलवारबाजी,दांडपट्टा,बॉक्सिंग,लेझीम,मानवी मनोरे,मार्चपास आदींचे धडे दिले.या शिबीराचा समारोप कार्यक्रम हालगे गार्डन येथे रविवारी सायंकाळी ६.३० वाजता सुरु झालेला समारोपाचा हा कार्यक्रम रात्री १० वाजेपर्यंत चालला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यनाथ देवल कमेटीचे विश्वस्त राजेश देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन विनोद सामत,डॉ.हरिश्चंद्र वंगे,विकासराव डुबे,रमेश कराड,प्राचार्या व्ही.व्ही.देशपांडे,अभयकुमार ठक्कर,राजेश्वर देशमुख, पत्रकार धनंजय आढाव,नारायण सातपुते,प्रकाश जोशी आदींची उपस्थिती होती.यावेळी बोलताना दत्ताप्पा ईटके गुरुजी म्हणाले की,३५ वर्षांपूर्वी २५ विद्यार्थ्यांच्या सहभागाने सुरु झालेल्या या शिबीराचे अनेक आधारस्तंभ आहेत यात वैद्यनाथ बॅंक, वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट व पालकवर्ग महत्वाचा दुवा आहे.यामुळेच हे शिबीर आज लोकचळवळ बनले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.वीरश्री आर्या व प्रा.उमाकांत कुरे
यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.अतुल दुबे यांनी मानले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शिबीरप्रमुख सुभाष नानेकर,सुरेश टाक,विलास आरगडे,महात्मा हत्ते,अतुल दुबे,सौ.वीरश्री आर्या,कु.संस्कृती संघई,ॲड.सोनिया फड,प्रणिता चाटे,अस्मिता कावरे,सुनिता सावजी,गौरी गुळवे,स्वाती वाघमारे,दिगंबर नागराळे,विक्रम स्वामी,शिवशंकर कराड,विजय मुंडे,अमोल माळी,उमाकांत कुरे,अमर देशमुख,माऊली मुंडे,सायस मुंडे,विजय मुंडे,यशवंत कांबळे,वैजनाथ इटके,शिवशंकर कराड,हरीभाऊ बनसोडे,दत्ताराव नागापुरे,महादेव फड,उमाकांत कुरे,विक्रम स्वामी,दिगांबर नागराळे,बाळू भातांगळे आदींनी परिश्रम घेतले.
@@@@@@@
मुलींचा सहभाग लक्षणीय
हनुमान व्यायाम शाळेच्या या शिबिरात सहभागी झालेल्या ३८० विद्यार्थ्यापैकी १७० मुलींनी सहभाग नोंदवला आहे.एक महिन्यात मुलींनी लाठी-काठी,कराटे,तलवारबाजी,श्लोक पाठांतर करत स्वसंरक्षणाचे धडे घेतले.एवढ्या मोठ्या संख्येने मुलींचा सहभाग असलेले हे शिबिर परळीच्या भावी पिढीला सक्षम करणारे ठरले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा