नागरिकांच्या स्वाक्षरीने नगरपरिषदेला निवेदन सादर!

पुरातन वारसा जपा:पडझड होत असलेल्या ऐतिहासिक राणी लक्ष्मीबाई टॉवरचे जतन करावे - अश्विन मोगरकर

परळी वैजनाथ । प्रतिनिधी....

        परळी शहराची ओळख असलेले ऐतिहासिक वास्तू म्हणून परिचित असलेल्या परळी शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवरची देखभाली अभावी पडझड होत असून परळी नगरपरिषदेने या ऐतिहासिक वास्तूची पडझड रोखून मूळ स्वरूपात कुठलाही बदल न करता ही वास्तू जतन करावी अशी मागणी अश्विन मोगरकर यांनी परळी नगरपरिषद प्रशासनाकडे केली आहे.

परळी वैजनाथ शहरात मध्यवर्ती ठिकाणी किमान 50 वर्षांपूर्वी राणी लक्ष्मीबाई टॉवर उभे करण्यात आले होते. या वास्तुशी परळीतील संवेदनशील नागरिकांचे भावनिक नाते जुळलेले आहे. या राणी लक्ष्मीबाई टॉवरच्या देखभाली अभावी पडझड होत आहे. पाच दशकांहुन अधिक वर्षांपूर्वी उभे केलेले टॉवर ही परळीची ओळख आहे. प्रत्येक परळीकर नागरिकाला या वास्तुविषयी आत्मीयता आहे. परळीचा हा वारसा टिकावा व जतन करण्यात यावा यासाठी नगरपरिषदेने त्वरित पाऊले उचलली पाहिजेत. जगात अनेक अश्या जुन्या वास्तुंना हेतुपुरस्सर जपले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून राणी लक्ष्मीबाई टॉवरच्या मूळ स्वरूपात बदल न करता येऊ शकते. यासाठी नगरपरिषदेने त्वरित याबाबतीत हालचाली कराव्यात अशी मागणी अश्विन मोगरकर यांनी केली आहे.

परळीची ओळख असलेले राणी लक्ष्मीबाई टॉवर संवर्धन व्हावे, टॉवरच्या संवर्धनासाठी तात्काळ कृती करावी, तसेच राणी लक्ष्मीबाई टॉवर वर लावले जाणारे बॅनर, पोस्टर वर बंदी आणावी व टॉवर चे विद्रुपीकरण थांबवावे या मागणीचे निवेदन गुरुवार, दि 29 मे रोजी परळी नगरपरिषद प्रशासनास देण्यात आले. या निवेदनावर अश्विन मोगरकर, कल्पेश बियाणी, रमेश चौंडे, अरुण पाठक, योगेश पांडकर, विजय जोशी, मोहन राजमाने, सतीश अग्रवाल, जयंत अरणकल्ले, ओमप्रकाश सारडा, भारत अग्रवाल, रमाकांत नाना टाक, एकनाथ शिंदे, भरत सोनपेठकर, प्रणव टाक, लक्ष्मणराव भोयटे, नदीम शेख, धनराज कुरील, राधाकिशन कांबळे, श्रीकांत सोळंके, मधुकर गित्ते, प्रवीण फुटके यांच्या स्वाक्षरी आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार