जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेत भूरटी चोरी
परळी प्रतिनिधी.......
येथील जिल्हा परिषद माध्यमिक कन्या प्रशालेत शाळेच्या छतावरील पाण्याच्या टाक्याची लोखंडी पाईपलाईन चोरीला गेल्याची घटना दिनांक 19 रोजी घडली आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
गणेशपार रोडवर जवाहरलाल नेहरू महाविद्यालयाच्या मागे असणाऱ्या जिल्हा परिषद माध्यमिक कन्या प्रशालेच्या छतावर पाण्याच्या सहा टाक्या आहेत. या टाक्याचे लोखंडी पाईप लाईन द्वारे पाणी शाळेतील पिण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी व स्वच्छता गृहासाठी वापरले जाते. ही लोखंडी पाईप लाईन अज्ञात चोरट्याने कट्टर च्या माध्यमातून कापून नेली आहे.
याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी संभाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पाईपलाईन चोरीला गेल्यामुळे शाळेतील पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा