परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

एसपींची दोघांवर कारवाई: गांजाफुक्या सुरक्षारक्षक व वाळू माफियाला मदत करणारा शिपाई बडतर्फ !



बीड — दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.यामध्ये गांजाफुक्या व वाळू तस्करीत मदत करणाऱ्या पोलीसांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षकांच्या घरात गांजा ओढत बसलेल्या बाळू गहिनीनाथ बहिरवाळ तसेच वाळू माफियाला पळून जाण्यास मदत करणारा रामप्रसाद शिवनाथ कडूळे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी ही कारवाई केली.

            बाळू गहिनीनाथ बहिरवाळ हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या निवासस्थानी सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त करण्यात आला होता. तो एका खोलीत गांजा ओढत बसलेला असताना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास पकडला गेला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बहिरवाळ विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबरोबरच रामप्रसाद कडूळे हा कर्मचारी पिंपळनेर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. लाच स्वीकारताना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला पकडले होते. याप्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले होते. निलंबन कालावधी संपल्यानंतर पोलीस मुख्यालयात कडूळेस नेमणूक दिली. या काळात पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील वाळू चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी गोरख काळेच्या संपर्कात राहून त्यास पोलिसांच्या गोपनीय हालचालींची माहिती पुरवली. त्याला पळून लावण्यात सहकार्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यास कलम 49 ,303 (2),3(5) अन्वये कलम 130 /177, 39/192 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक देखील करण्यात आली होती सध्या तो पोलीस कोठडीत आहे. रामप्रसाद कडूळे यांचे वर्तन गुन्हेगारी स्वरूपाचे असून पोलीस खात्यास न शोभणारे आहेत. पोलीस दलाची प्रतिमा त्याच्यामुळे मलीन झाली असल्याने पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सेवेतून बडतर्फ केले आहे. पोलीस हे कायद्याचा रक्षक आहेत त्यामुळे पोलिसांच्या कोणत्याही बेकायदेशीर गुन्हेगारी कृत्यास खपवून घेतले जाणार नाही कोणताही पोलीस अधिकारी किंवा अंमलदार कोणत्याही बेकायदेशीर किंवा गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी आढळून आल्यास त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिला आहे.

      



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!