सुरक्षा रक्षक पोलिसांच्या ताब्यात

 पवनचक्की गोळीबार प्रकरण:सुरक्षा रक्षकासह चोरट्यांवर गुन्हा

बीड, प्रतिनिधी : तालुक्यातील लिंबागणेशजवळील पवनचक्कीचे काम करणाऱ्या प्रकल्पाच्या ठिकाणी चोरी करण्यासाठी आलेल्या १५ चोरट्यांविरोधात सुरक्षा रक्षकाने तक्रार दिली आहे. तर बचावासाठी केलेल्या गोळीबारात चोरटा मृत झाल्याने सुरक्षा रक्षकावरही गुन्हा दाखल झाला आहे. नेकनूर पोलिसांत हे गुन्हे नोंद झाले असून रक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

       लिंबागणेशजवळील पवनचक्कीचे काम ओटी पाॅवर ही कंपनी करत आहे. याच ठिकाणी २३ मे रोजी पहाटे १ वाजता चोरांची टोळी आली. त्यांनी गेट तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर सुरक्षा रक्षकासह इतरांवर लोखंडी रॉड, दगडफेक करून मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी सुपरवायझर संजय गित्ते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर याच ठिकाणी रूपसिंग सरदारसिंग टाक (रा.पाटोदा) या सुरक्षा रक्षकाने चोरांच्या दिशेने गोळीबार केला होता. यात राजू उर्फ चिचा विष्णू काळे (वय २३ रा. तुळजापूर, जि.धाराशिव) याला पाठीमागून गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात चिचाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून टाकविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. नेकनूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !