एक महिन्यापूर्वीच लग्न झालं, नवविवाहित पती-पत्नी जोडीने मंदिरात दर्शनाला गेले, पती दर्शन करून येईपर्यंत पत्नीच गायब !

 परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

          नवरा बायको मिळून जोडीने वैद्यनाथ मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर एक खळबळजनक घटना घडली आहे. गाभाऱ्यातून दर्शन घेऊन येईपर्यंत पत्नीच गायब झाल्याची घटना दि. पाच रोजी घडली आहे. याप्रकरणी आता पतीने पोलिसात धाव घेत पत्नी गायब असल्याची खबर दाखल केली असुन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

     याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, परळीतील वडार काॅलनी भागातील रहिवासी २७ वर्षीय फिर्यादी हा ड्रायव्हर आहे. त्याचे एक महिन्यांपूर्वीच लग्न झालेले आहे.आपल्या नवपरिनीत पत्नीला घेऊन दि. 05/05/2025 रोजी सकाळी 08.30 वाजण्याचे सुमारास ते दर्शनासाठी वैद्यनाथ मंदिरात गेले होते.मंदीरामध्ये महीला व पुरुष यांची वेगळी दर्शन रांग आहे. पती पुरुष रांगेत तर पत्नी महिलांच्या रांगेतून दर्शनाला गेले. गाभाऱ्यात पोहचण्यात मागे पुढे झाले.दर्शन घेऊन प्रदक्षिणा मार्गावर बघितले असता पत्नी दिसली नाही.दर्शन घेऊन बाहेर थांबली असेल म्हणून मंदिर परिसरात शोध घेतला परंतु पत्नी कुठेच आढळत नसल्याचे दिसून आले.ती कोणाला काही न सांगता निधुन गेली हे लक्षात आले.घरी, गल्लीमध्ये, नातेवाईकांकडे सगळीकडे शोध घेतल्यावरही तिचा पत्ता लागत नसल्याने या पतीने अखेर पोलीसांकडे बेपत्ता झाल्याची खबर नोंदवली आहे.याबाबत परळी शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

         




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !