अभिष्टचिंतन लेख:✍️ बालाजी ढगे
निर्भिड आणि सामाजिक जाणीव असलेला आदर्श पत्रकार : संतोष जुजगर
लोकशाही चा चौथ स्तंभ पत्रकारिता क्षेत्रात कोहिनूर हिरा. संतोषभाऊ जुजगर यांना वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा! आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य ते सातत्याने आपल्या लेखनाच्या माध्यमातून करतात हे त्यांच्या
निष्पक्ष पत्रकारितेचे प्रतीक आहे
संतोषभाऊ जुजगर हे सत्य आणि निर्भिड पत्रकारितेचे उत्कृष्ट उदाहरण आहेत.
*गावपातळीवरील समस्यांना वाचा फोडणे:- त्यांनी स्थानिक जनतेच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला.सत्याचा पाठपुरावा सत्य मांडणे ही त्यांची खास शैली असून, त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना उजेडात आणले आहे. *नवीन पत्रकारांसाठी प्रेरणा:- त्यांनी अनेक नव्या पत्रकारांना मार्गदर्शन करून योग्य दिशा दिली.
संतोषभाऊ जुजगर हे केवळ पत्रकारितेतच नव्हे, तर सामाजिक आणि धार्मिक कार्यातही सक्रिय असतात
विविध सामाजिक उपक्रमांत सहभागी होण्याची बांधिलकी ते नेहमी जपत असतात त्याचे धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये योगदान महत्त्वाचे आहे समाजाच्या हितासाठी
तरुणांना प्रेरणा देणारे त्याचे व्यक्तिमत्त्व आदर्श आहे.म्हणून त्यांची ओळख एक सर्व प्रिय व्यक्तीमहत्त्व केली तर चुकीचे ठरणार नाही.आज वाढदिवसा निमित्त त्यांना लाख लाख व विशेष शुभेच्छा
संतोषभाऊ जुजगर यांच्या लेखणीने असेच लोकहितवादीकाम व समाज उपयोगी व समाजातील अनेक समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करत राहो हिच अपेक्षा. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना उत्तम,निरोगी आणि यशस्वी आयुष्य लाभो हिच प्रभू वैद्यनाथ आणि आई तुळजाभवानी चरणी केली जाते.🙏
✍️ बालाजी ढगे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा