भावूक होत पंकजा मुंडेंनी वाहिली श्रद्धांजली!

 जिजांनी सदैव लेकीसारखी माया आणि 'ताईसाहेब" म्हणत नेता म्हणून सन्मान केला: देशमुख परिवाराला कधीही अंतर देणार नाही - ना.पंकजा मुंडे

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.. 

      स्व. आर.टी. देशमुख जिजा यांच्यासारखा जिवाभावाचा देवमाणूस आता पुन्हा होणे नाही. माझ्या संपूर्ण जीवनात एक परिवारातील सदस्य म्हणून त्यांनी सदैव माझ्यावर लेकीसारखी माया केली आणि मी नेतृत्व करताना 'ताईसाहेब' म्हणत नेता म्हणून माझा सन्मान केला. अशा सालस, सोज्वळ व निष्ठावान व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने खूप मोठी हानी झाली आहे. त्यांच्या माघारी देशमुख परिवाराला मी कधीही अंतर देणार नाही अशा शब्दात श्रद्धांजली वाहून ना पंकजाताई मुंडे यांनी स्व.आर.टी. देशमुख यांना अखेरचा निरोप दिला.

     माजलगाव मतदार संघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांच्या दुर्दैवी अपघाती निधन झाले. राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आपले सर्व कार्यक्रम व दौरै रद्द करून त्या या कुटुंबाला आधार देत तीन दिवस परळीतच थांबल्या. स्व.आर.टी. देशमुख यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात आले. शासन प्रतिनिधी म्हणून ना. पंकजाताई मुंडे यांनी सरकारच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करत आर.टी. देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली.

      यावेळी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना पंकजाताई मुंडे भावूक झाल्या होत्या. त्यांनी सांगितले की, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्यापासून आमचे देशमुख परिवाराशी पारिवारिक स्नेहबंधाचे नाते आहे. माझ्या जीवनातील प्रत्येक बाबीत जिजा हे कुटुंबातील सदस्यां प्रमाणेच आमचे आधारवड राहिलेले आहेत. राजकीय, सामाजिक व कौटुंबिक अशा सर्व स्तरावर भक्कम आधार देत त्यांनी मुंडे साहेबांपासून व नंतर माझ्यासोबत अतिशय निष्ठेने, तळमळीने व प्रामाणिकपणे काम केले. मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांनी सदैव माझा ताईसाहेब असाच उल्लेख केला. गेल्या 20-22 वर्षात एकदाही त्यांना रागावल्याचे मी पाहिलेले नाही. असा सालस, सोज्वळ आणि निष्ठावंत ज्येष्ठ सहकारी गेल्याचे अतिव दुःख आहे. स्व. जीजांनी माझ्यावर लेकीसारखे प्रेम केले आणि नेता म्हणून नेहमीच सन्मान राखला. एक लेक म्हणूनच या परिवाराशी आयुष्यभर आपला स्नेह राहणार असुन जिजांच्या जाण्यानंतर देशमुख परिवाराला आपण कधीही अंतर देणार नाही असा शब्द नामदार पंकजाताई मुंडे यांनी यावेळी देत आर.टी. देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार