परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

ज्या गावात अडवले, तिथं ताईंच्या आगमनावर ग्रामस्थांच्या समाधानी नजरा

 ना. पंकजा मुंडे यांनी घेतली स्व. बाबासाहेब आगेंच्या कुटुंबियांची भेट

आगे परिवाराचे दुःख हे माझेही ; त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गरज पडली तर सुप्रीम कोर्टापर्यंत लढू


पत्नी व मुलीची घेतली जबाबदारी ; गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानची मदत सुपूर्द


माजलगांव।दिनांक ०३।

राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी आज किट्टी आडगाव येथे जाऊन स्व. बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. आगे परिवाराचे दुःख हे माझे दुःख आहे, एक चांगला कार्यकर्ता आपण गमावला आहे. आगे परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी गरज पडली तर  सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देऊ अशा शब्दांत धीर देत ना. पंकजाताईंनी आगे यांच्या आई, पत्नी व मुलीची जबाबदारी घेतली. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या मदतीचा धनादेश यावेळी आगे परिवाराला देण्यात आला.


    भाजपचे जिल्हा विस्तारक स्व बाबासाहेब आगे यांची काही दिवसापूर्वी हत्या झाली होती. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, अजूनही या दुःखातून ते सावरले नाहीत. मध्यंतरी ना. पंकजाताई मुंडे बीड दौर्‍यावर आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी या परिवाराचे दूरध्वनीवरून सांत्वन केले होते व पुढील दौऱ्यात येऊ असे सांगितले होते. त्यानुसार आज त्यांनी किट्टी आडगाव येथे जाऊन आगे यांच्या आई, पत्नी व त्यांच्या चिमुकलीची भेट घेतली व सांत्वन केले.


आगे यांची मी मोठी बहिण, त्यांचं दुःख मलाही

--------

स्व. बाबासाहेब आगे एक धडाडीचा कार्यकर्ता होता, त्यांच्या जाण्याने मलाही खूप दुःख झाले आहे, ते मला भावासारखे होते.त्यांचं कुटुंब स्वाभिमानी आहे, त्यांचा स्वाभिमान कायम ठेवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जी काही मदत लागेल ती मी जरूर करेन. गरज पडली तर सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देण्यासाठी प्रयत्न करू अशा शब्दांत धीर देत ना. पंकजाताईंनी आगे यांच्या पत्नी व मुलीची जबाबदारी स्वीकारत असल्याचे म्हटले.


ज्या गावात अडवले, तिथं ताईंच्या आगमनावर ग्रामस्थांच्या समाधानी  नजरा

-----------

लोकसभा निवडणुकीत प्रचाराच्या वेळी ना. पंकजाताईंना किट्टी आडगाव येथे अडवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला होता. आज त्याच गावात ना. पंकजाताई मुंडे गेल्या. त्या येणार असल्याने ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती, लोकं रस्त्याच्या दोन्ही बाजूने थांबले होते. कार्यकर्त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आलेल्या ना. पंकजाताईंचे रस्त्यावर उभा असलेल्या ग्रामस्थांनी केवळ एका नजरेने स्वागत केले, तशा छटा त्यांच्या चेहर्‍यावर यावेळी दिसून आल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!