आणखी एका व्हायरल व्हीडीओ प्रकरणी परळीत गुन्हा दाखल
परळी वैजनाथ:शिवराज दिवटे अमानुष मारहाण प्रकरण घडल्यानंतर जुन्या मारहाणीचे काही व्हीडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.शिवराज दिवटे मारहाण प्रकरणातील एक आरोपी समाधान मुंडे याला १०ते १२ जणांनी मारहाण केल्याचा व्हीडीओ व्हायरल झाला होता .याप्रकरणी त्याच्या आईच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आता परळी ग्रामीण पोलीस ठाण्यातही २५.०७.२०२४ रोजी घडलेल्या मारहाण प्रकरणी व्हायरल व्हीडीओच्या अनुषंगाने योगीराज अशोक गिते रा. नंदागौळ ता. परळी वै. याच्या फिर्यादीवरून रस्त्यात आडवुन मोटारसायकलवर बळजबरीने बसउन विठ्ठल टेकडी येथे घेऊन जाऊन कमरेच्या बेल्टने व लाथाबुक्याने माराहन करुन जखमी केले व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली व सदर घटनेची मोबाईल मध्ये व्हीडीओ शुटींग केली. म्हणून १) सचिन विष्णु मुंडे २) अदित्य बाबासाहेब गित्ते ३) सुमीत ऊर्फ बबलु बालाजी गित्ते सर्व रा.नंदागौळ ता. परळी वै. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा