पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती:आज राष्ट्रसेविका समितीच्या वतीने वैद्यनाथ मंदिरात सघोष मानवंदना 

परळी वैजनाथ।प्रतिनिधी...

      राजमाता पुण्यश्लोक साध्वी अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त परळी वैजनाथ येथे ज्योतिर्लिंग वैद्यनाथ मंदिरात अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला राष्ट्रसेविका समितीच्या वतीने सघोष मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

      अहिल्यादेवी होळकर यांची आज दि. 31मे रोजी जयंती आहे. त्यानिमित्त त्यांना राष्ट्रसेविका समिती, देवगिरी प्रांत तर्फे सघोष मानवंदना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी सर्व हिंदू बांधव आणि भगिनी यांनी  सकाळी 9.30 वाजता प्रभू वैद्यनाथ मंदिर, परळी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे पुतळ्या समोर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. परळी वैजनाथ येथील वैद्यनाथ मंदिरासह अन्य सर्व ज्योतिर्लिंग मंदिरांचा जिर्णोद्धार करणाऱ्या शिवभक्त पुण्यश्लोक साध्वी अहिल्यादेवी होळकर यांची त्रीशताब्दी जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. परळी वैजनाथशी साध्वी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा असलेला स्नेहभाव आणि त्यांच्या स्मृती हे वेगळेच नाते आहे.यामुळे परळी वैजनाथ येथील वैजनाथ मंदिरातील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या रूपाने असलेले स्मृतिस्थळ हे एक प्रेरणास्थळ आहे.

           याच ठिकाणी आज जयंती निमित्त राष्ट्रसेविका समितीच्या वतीने सघोष मानवंदना देण्यात येणार आहे. गेल्या पंधरा दिवसापासून राष्ट्रसेविका समितीचे प्रशिक्षण शिबिर परळी येथे सुरू आहे. त्यानिमित्ताने देवगिरी प्रांतातील सर्व प्रशिक्षणार्थी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, मान्यवर, राष्ट्रसेविका समितीच्या पदाधिकारी या परळीतच आहेत. या अनुषंगाने राष्ट्रसेविका समितीच्या वतीने शहरातून शिस्तबद्ध पथसंचलनही करण्यात आले. त्यानंतर आता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीदिनी सघोष मानवंदना देवून अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सर्व धर्मप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !