नागापुर येथे पंकजा मुंडेंनी केलं कै. गणपत बनसोडे कुटुंबियांचं सांत्वन
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
भाजपचे नागापूर, परळी येथील ज्येष्ठ कार्यकर्ते कै. गणपत बनसोडे यांचे नुकतेच दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले होते, आज परळी दौर्यात पंकजा मुंडे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या परिवाराची भेट घेतली व सांत्वन करत धीर दिला. एक मनमिळावू व धडाडीचा कार्यकर्ता काळाने हिरावून घेतला, त्यांची उणीव भासत राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
वैद्यनाथ साखर कारखान्याचे संचालक पद भूषविलेले गणपत बनसोडे हे भाजपचे एक निष्ठावंत व सच्चे कार्यकर्ते होते. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे देखील संचालक होते. एक मनमिळावू, अनुभवी व सर्वांच्या मदतीला धावून येणारे अशी त्यांची ख्याती होती. ते आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते होते. एक मनमिळावू व धडाडीचा कार्यकर्ता काळाने हिरावून घेतला, त्यांची उणीव भासत राहील अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा