इमेज
  गर्भवती महिला हेळसांड: उपचारातील हलगर्जी प्रकरणी गित्ते हाॅस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्याची मागणी परळी वैजनाथ, प्रतिनिधी:        शहरातील गित्ते हाॅस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात आता पुरावे सुरक्षित ठेवण्याची मागणी पुढे आली आहे. तक्रारदाराने शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित रुग्णालय तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि डीव्हीआर तात्काळ जप्त करून सुरक्षित ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.          तक्रारदार वैजनाथ संभाजी मुंडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीवर उपचार करताना डाॅ.कल्पना सचिन गित्ते यांच्याविरुद्ध हलगर्जीपणा झाल्याचा आरोप यापूर्वीच लेखी तक्रार करुन करण्यात आला आहे. या प्रकरणात सत्य समोर येण्यासाठी रुग्णालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.२३ एप्रिल ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयातील केबिन, कॉरिडॉर तसेच बाहेरील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच रु...

कवयित्री अपर्णा कुलकर्णी यांचा अनोखा उपक्रम

यावर्षी अंबाजोगाईला पुस्तकाचे गाव म्हणून सन्मान मिळाला म्हणून महिलांनी हळदी कुंकवाबरोबरच दिले पुस्तक भेट

अंबाजोगाई -(वसुदेव शिंदे)-

       हा महिना घरोघरी चैत्र व गौरीचा.... त्या  निमित्त महिला मोठ्या प्रमाणात हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवतात त्यानिमित्ताने विचारांची आदान प्रदान होते गौरी समोर आरास केले जातात. अंबाजोगाई शहरातील कल्याणनगर मधील  कवयित्री अपर्णा कुलकर्णी यांनी यावर्षी पुस्तकाचे आरास देखावा केला होता गौरी गणपती समोर केला  या वर्षी अंबाजोगाईला पुस्तकाचे गाव हा सन्मान मिळाला त्या आनंदा प्रित्यर्थ यावर्षी त्यांनी पुस्तकाची आरास करून विविध महामानवाचे चरित्र ग्रंथ ठेवून पुस्तकाने गौरीला सजविले व त्यानिमित्त महिलांना पुस्तक भेट दिले  हा अनोखा उपक्रम राबवुन अंबाजोगाई नगरी पुस्तकाची ही जननी आहे यामुळे पुस्तके जास्तीत जास्त वाचली जावीत पण घराघरात पुस्तकाची जागा मोबाईलने घेतली आहे त्यामुळे वाचन संस्कृती नष्ट होत चालली आहे वाचन नसल्यामुळे समाजात अविवेकीपणा वाढत आहे त्यामुळे समाजात वाढत आहे त्यामुळे समाजात आज वाचन असल्यामुळे चांगले वाईट व्यक्त नाही समाजामध्ये विवेक संपत चालले आहेत तो विवेक जागृत करण्यासाठी पुस्तके एकच मुख्य साधन आहे म्हणून पुस्तकाचे गाव असल्यामुळे प्रत्येकाने घराघरात पुस्तक गेले पाहिजे ते वाचले पाहिजे व समाज निर्मितीसाठी वाचन सांस्कृती जपली पाहिजे आपण प्रत्येक प्रबोधनातून उपक्रम राबवून सामाजिक  उपक्रम राबविले पाहिजेत पुस्तकाचे वाचन संस्कृती चळवळ निर्मिती होईल असे अपर्णा कुलकर्णी यांचे मत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....