व्यापारी महासंघाचा निर्णय
आर.टी.देशमुखांना श्रद्धांजली: अंत्यसंस्कार होईपर्यंतच व्यापारपेठ ठेवणार बंद
व्यापारी महासंघाचा निर्णय
परळी / प्रतिनिधी –
माजी आमदार आर. टी. देशमुख उर्फ जिजा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने परळीकरांनी एक जनसामान्यांचा आधारवड गमावला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण शहरात शोककळा पसरली असून विविध स्तरातून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
या पार्श्वभूमीवर बुधवार, दिनांक 28 मे रोजी सकाळी 11 वाजता अंत्यविधी पार पडणार आहे. या वेळी शहरातील व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन विविध व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा, मनमिळावू स्वभावाचा आणि सामाजिक भान असलेल्या नेतृत्वाचा आदर म्हणून आज दुपारी 1 वाजेपर्यंत परळी शहरातील संपूर्ण व्यापारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे.शहरातील सर्व व्यापार्यांनी या निर्णयाला पाठिंबा देत देशमुख यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन व्यापारी संघटनांकडून करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा